Home /News /entertainment /

'मी स्वत:च्या विचारांपासून मुक्ती....' ' ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीच्या पोस्टवरून खळबळ

'मी स्वत:च्या विचारांपासून मुक्ती....' ' ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीच्या पोस्टवरून खळबळ

'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) आणि 'ब्रह्मराक्षस 2' (Brahmarakshas 2) सारख्या शोमध्ये दिसलेली टीव्ही अभिनेत्री निक्की शर्माने (Nikki Sharma) तिच्या इंस्टाग्राम पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने अचानक इन्स्टाग्रामवरून तिच्या सर्व पोस्ट आणि फोटो हटवून खळबळ उडवून दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 एप्रिल- 'ससुराल सिमर का'   (Sasural Simar Ka)  आणि 'ब्रह्मराक्षस 2'  (Brahmarakshas 2)  सारख्या शोमध्ये दिसलेली टीव्ही अभिनेत्री निक्की शर्माने   (Nikki Sharma)  तिच्या इंस्टाग्राम पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने अचानक इन्स्टाग्रामवरून तिच्या सर्व पोस्ट आणि फोटो हटवून खळबळ उडवून दिली आहे. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक चकित करणारी स्टोरी शेअर केली आहे. जी पाहून लोक चिंताग्रस्त झाले आहेत. सर्वानांच तिची काळजी वाटत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टने सर्वानांच धडकी भरवली होती. तिच्या या पोस्टवरून ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नाराज असल्याचं दिसत आहे. पण, नंतर निकीने तिच्या इन्स्टाग्रामवरून ही पोस्ट काढून टाकली आहे. तिने लिहलं होतं, 'मी प्रयत्न केला पण मी थकले आहे. मला आता माझ्या विचारांपासून मुक्त व्हायचं आहे.'' निक्की शर्माची ही पोस्ट पाहून तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकार मित्रांनाही धक्का बसला आहे. लोकांना तिची काळजी वाटत आहे. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिचा को-स्टार अभिषेक भालेरावने याला गांभीर्याने घेत ट्विट केले आहे. अभिषेकने ट्विट करत लिहिलंय, 'टीव्ही शो ससुराल सिमर का मधील निक्की शर्मा या माझ्या सह-अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील तिच्या सर्व पोस्ट हटवल्या आहेत. आणि तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील कोटला तीन तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. मी ईमेल आणि परस्पर संपर्काद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु मी तिच्याशी अद्यापही संपर्क साधू शकत नाहीय. हे प्रकरण पुढे वाढवावे की नाही असा बराच वेळ विचार केला पण मला वाटत होते की मी पोलिसांना कळवावं'. या सर्व प्रकारानंतर सुदैवाने अशी माहिती समोर आली आहे की, निक्की पूर्णपणे बरी आहे आणि ती नैराश्यातून जात आहे. अभिषेक भालेरावच्या ट्विटवर, आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करणाऱ्या टीमचे सदस्य नितेश सिंह यांनी माहिती दिली की, ''निक्की पूर्णपणे बरी आहे. ETimes च्या वृत्तानुसार, जेव्हा तिच्या एका सहकलाकाराने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा निक्की शर्माने तिला सांगितले की ती ठीक आहे आणि स्वतःची काळजी घेईल;''.त्यांनतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या