Home /News /entertainment /

'सरसेनापती हंबीरराव’ सिनेमात श्रुती मराठे दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, फर्स्ट लुकनं वेधलं लक्ष!

'सरसेनापती हंबीरराव’ सिनेमात श्रुती मराठे दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, फर्स्ट लुकनं वेधलं लक्ष!

अभिनेते प्रविण तरडेचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ ( sirsenapati hambirrao ) हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  मुंबई, 23 मे-  अभिनेते प्रविण तरडेचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ ( sirsenapati hambirrao ) हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना हा सिनेमा पाहण्याची अतुरता लागली आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे ( pravin tarde ) साकारत आहे. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आता या सिनेमाविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  आता या सिनेमात आणखी एक मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहे. तिचा नुकताच फर्स्ट लुक समोर आला आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुती मराठे ( shruti marathe) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रुती मराठेने इन्स्टावप ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवं पोस्टर रिलीज केले. 'राज्याच्या दोन्ही युवराजांना प्रेमानं वाढवलेली स्वराज्य माऊली!' अशी पोस्टला कॅप्शन तिनं दिली आहे. महाराणी सोयराबाई ( maharani soyarabai ) यांची भूमिका या सिनेमात ती साकारणार असल्याची माहिती तिनं या पोस्टमधून दिली आहे.
  श्रुती मराठे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती शेअर करत असते. तिच्या आगामी प्रोजक्टबद्दल माहिती देखील ती शेअर करताना दिसते. तिच्या य़ा नवीन भूमिकेबद्दल तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. चाहते देखील तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सिनेमातील फर्स्ट लुक पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. वाचा-'एक अभिनेत्री म्हणून..' बर्डथे गर्ल तेजस्विनीसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहिते-पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे. या मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या