बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांच्या जवळची ही व्यक्ती त्यांच्या मृत्यूबद्दल अनभिज्ञ

बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांच्या जवळची ही व्यक्ती त्यांच्या मृत्यूबद्दल अनभिज्ञ

बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शिका दिवंगत सरोज खान (Saroj Khan) यांच्या मृत्यूला पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांचं असं अकाली निधन बॉलिवूडसाठी धक्कादायक होतं.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर: बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शिका दिवंगत सरोज खान (Saroj Khan) यांच्या मृत्यूला पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 22 नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस होता. यावर्षी त्यांनी 72 व्या वर्षात पदार्पण केलं असतं. त्यांची मुलगी सुकाईना नागपाल (Sukaina Nagpal) यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की, सरोज खान यांच्या वाढदिवशी 22 नोव्हेंबरला सुकाईना यांच्या मुलीचा म्हणजेच सरोज खान यांच्या नातीचा देखील वाढदिवस असतो. त्यामुळे यादिवशी त्यांच्या मनात संमिश्र प्रकारच्या भावना होत्या.

ई- टाइम्स बरोबर संवाद साधताना नागपाल यांनी आपली मुलगी आलिया हिचा जन्म देखील पाच वर्षांपूर्वी 22 नोव्हेंबरला झाला होता असं सांगितलं. सरोज खान यांच्या वाढदिवशी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी सुकाईना यांच्यासह सरोज यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदानदेखील केलं. आपल्या या वाढदिवशी त्यांची मुलगी आलिया हिने आपली आजी कुठे गेली आहे असा प्रश्न विचारला. या प्रश्नाने निरुत्तर झालेल्या सुकाईना यांनी आणि त्यांच्या पतीने तिला आजी सुट्टीवर आणि शूटिंगसाठी गेल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही दिवसांत ती परत येणार असल्याचे देखील सांगितले. आजी आलियाच्या वाढदिवसाला येत असल्याने यावर्षी देखील ती तिची वाट पाहत होती.

(हे वाचा-अभिमानास्पद! या भारतीय वेबसीरिजने पटकावला International Emmy Award 2020)

सरोज खान हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना भेटायला आलिया जात असे. परंतु आजी आता हॉस्पिटलमधून कुठे गेली असा प्रश्न या चिमुरडीला  पडला आहे. पण इतक्या लहान वयात तिला सत्य सांगणं शक्य नसल्याने आपण मुलीला अद्याप याविषयी सांगितले नसल्याचे सुकाईना यांनी सांगितले.

(हे वाचा-'4 वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न', 'काय पो छे'मधील सुशांतच्या सहकलाकाराचा खुलासा)

आलियाच्या प्रत्येक वाढदिवसाला सरोज खान हजर असायच्या. तिच्या चारही वाढदिवसांना एकाच केकवर तिचे आणि तिच्या आजीचे नाव असलेले केक दोघी कापत असतं. परंतु या वाढदिवसाला केक खरेदी करून हा केक आजीने दिल्याचं सुकाईना यांनी आलिया हिला सांगितले. सुकाईना यांनी 22 नोव्हेंबरला इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट देखील केली होती.

तर या दिवशी सरोज खान यांची दुसरी नात नबीला हिने आपल्या आजीच्या वाढदिवशी एक लांबलचक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती.

इंस्टाग्रामवरील आपल्या या पोस्टमध्ये तिने आपल्या आजीला आधारस्तंभ म्हटले होते. दरम्यान, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे 3 जुलै 2020 रोजी कार्डियक अरेस्टने निधन झाले होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 25, 2020, 8:17 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या