मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sarang sathaye : 'झेंडे आणि मिठाई वाटून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापेक्षा...' सारंग साठ्येची 'ती' पोस्ट चर्चेत

Sarang sathaye : 'झेंडे आणि मिठाई वाटून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापेक्षा...' सारंग साठ्येची 'ती' पोस्ट चर्चेत

Sarang sathaye

Sarang sathaye

अभिनेता, दिग्दर्शक सारंग साठ्येने अतिशय वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्याने शुभेच्छा देत लोकांना जबाबदारीची जाणीव करून देणारा उपक्रम राबवला आहे. तो सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 15 ऑगस्ट : आज सगळ्या भारतात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आज भारतीय स्वातंत्र्याला  75 वर्ष पूर्ण झाल्याने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आलेल्या 'हर घर तिरंगा' या मोहिमेलाही लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. चित्रपटसृष्टीत देखील स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. पण आज आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकाराच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता, दिग्दर्शक सारंग साठ्येने अतिशय वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. तो सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, 'भाडिपा'चा संस्थापक, कॉमेडियन अशा विविध भूमिका पार पडणारा  'जगात भारी' सारंग साठ्ये चाहत्यांचा फेव्हरेट आहे. तो विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतो. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यानेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्या शुभेच्छा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्याने आज पुण्यातील रस्त्यावरचा कचरा उचलत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. त्याने सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
View this post on Instagram

A post shared by Sarang (@sarangsathaye)

सारंग साठ्येने या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, 'होय, आपल्या प्रिय देशाचा अभिमान बाळगणे, झेंडे लावणे  आणि मिठाई वाटून स्वातंत्र्यदिन साजरा करणे   महत्त्वाचे आहेच, परंतु त्याबद्दल खरोखर छान वाटणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटत असेल तर त्याबद्दल तुम्ही जबाबदारीने देखील वागले पाहिजे.जेव्हा जेव्हा मी, पॉल आणि माझा भाऊ रस्त्यावरून चालत असतो तेव्हा तिथे असलेल्या कचरा आणि घाणीमुळे आम्हाला आपण आपला देश किती अस्वच्छ ठेवतो याची अत्यंत लाज वाटते.' हेही वाचा - Om Bhutkar : मुळशी पॅटर्नच्या खतरनाक भूमिकेनंतर ओम भुतकर साकारणार 'ही' भूमिका; नव्या सिनेमाची घोषणा पुढे त्याने लिहिले आहे कि, 'आम्ही मुठा नदीच्या काठावर लहानाचे मोठे झालो. आज तिथे अतिक्रमण झाले आहे आणि तेथील प्रत्येक कोपरा अस्वच्छ दिसत आहे. मला लहानपणी त्या नदीत पोहल्याचे आठवते. आज ध्वजारोहणासाठी जाण्याऐवजी आम्ही एका वेळी एक कोपरा निवडून तो स्वच्छ करण्याचे ठरवले. नदीकाठच्या रस्त्यावरून सुरुवात केली. आम्ही तिघे आणि  आम्हाला सामील झालेले दोन अनोळखी लोक आम्हाला मिळून  हे सर्व साफ करण्यासाठी 20 मिनिटे लागली. पांढरे कपडे घालून रॅलीत सहभागी होण्यापेक्षा या कचरा उचलून घाणेरड्या झालेल्या  कपड्यांमुळे आम्हाला जास्त आनंद झाला. आम्ही हे इथूनपुढे नेहमी करणार आहोत. आवडल्यास सामील व्हा. तसेच जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमचा एखादा कोपरा निवडून स्वच्छ करा.' सारंग साठ्येने आज अतिशय वेगळा विषय या पोस्टद्वारे मांडला आहे. त्याच्या या उपक्रमासाठी त्याचे सगळीकडून कौतुक होत आहे. अनेक कलाकारांनी देखील त्याच्या पोस्टवर कमेंट करत  त्याला पाठींबा दर्शवला आहे.
First published:

Tags: Independence day, Marathi entertainment

पुढील बातम्या