Home /News /entertainment /

स्टेजवरच सारा अली खाननं सलमानला म्हटलं 'अंकल', पाहा भाईजानच्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO

स्टेजवरच सारा अली खाननं सलमानला म्हटलं 'अंकल', पाहा भाईजानच्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO

सध्या सलमान खान आणि अभिनेत्री सारा अली खानचा (Sara ali Khan) एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष केंद्रित करत आहे.

  मुंबई, 25 जून : बाॅलिवूडचा दबंग भाई अभिनेता सलमान खानची (Salman Khan Latest News))फॅनफाॅलोविंग काही कमी नाही. सलमान चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी अनेक वेळा सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. नवनवीन फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेला सलमान खान आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या सलमान खान आणि अभिनेत्री सारा अली खानचा (Sara ali Khan) एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष केंद्रित करत आहे. IIFA 2022 मध्ये सारा अली खान आणि सलमान खान (salman & sara share the stage)यांनी एक स्टेज शेअर केला होता. याच कार्यक्रमातील दोघांचा एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होत (Vedio viral)आहे. काॅमिक टायमिंग असणारे दोघेही एकाच मंचावर म्हटल्यावर मजा तर दुप्पट होणारच ना!,व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सारा सलमान खानला अंकल म्हणताना दिसत आहे. सारानं स्टेजवर म्हटलं की, मला सलमान अंकलसोबत एक बॅंड काढायचा आहे. साराच्या या वक्तव्यावर सलमानने देखील मजेदार प्रतिक्रिया दिलेली पहायला मिळाली. हेही वाचा - 30 years of SRK career: शाहरुखला आहे 'ही' सगळ्यात वाईट सवय, अनेकदा खावी लागलीत बोलणी सलमाननं साराच्या मजेदार वक्तव्यावर म्हटलं की, सारा आता माझ्या पुढच्या चित्रपटात गायिका होणार नाही. सलमानच्या मजेदार प्रतिक्रियेनं सगळेच हसायला लागले आणि कार्यक्रमात हास्यकल्लोळ पहायला मिळाला. सलमान साराचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून मजेदार कमेंट येताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्सचा वर्षाव होत असून व्हिडीओला शेअर केलं जात आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  दरम्यान, हा व्हिडीओ कलर्स टीव्हीनं ऑफिशिअल अकाऊंंटवर शेअर केला आहे. सारा आणि सलमानच्या काॅमेडीनं IIFA चा माहोल मस्त झाला, असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Salman khan, Sara ali khan

  पुढील बातम्या