Home /News /entertainment /

Sara Ali Khan ला चाहत्याने दिला गरमागरम वडापाव; अभिनेत्रीचा भन्नाट VIDEO होतोय VIRAL

Sara Ali Khan ला चाहत्याने दिला गरमागरम वडापाव; अभिनेत्रीचा भन्नाट VIDEO होतोय VIRAL

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नवाब घराण्यातली असली तरी ती खूप 'डाउन टू अर्थ' आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी त्यांची मुलगी साराला मोठ्या लाडाने वाढवले ​​आहे. यासोबतच त्यांनी आपल्या मुलीला चांगले संस्कारही दिले आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 11 नोव्हेंबर-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan)  नवाब घराण्यातली असली तरी ती खूप 'डाउन टू अर्थ' आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी त्यांची मुलगी साराला मोठ्या लाडाने वाढवले ​​आहे. यासोबतच त्यांनी आपल्या मुलीला चांगले संस्कारही दिले आहेत. चाहत्यांना कसे भेटायचे? त्यांना कसे सामोरे जावे? हे सर्व साराला चांगलंच माहीत आहे. सारा अली खान पडद्यावर जितकी ग्लॅमरस दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यात साधीसरळ आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अलीकडेच सारा अली खान आणि विकी कौशल मुंबईत ऐके ठिकाणी स्पॉट झाले होते.
  व्हिडिओमध्ये  (Viral Video)  तुम्ही पाहू शकता की सारा अली खान तिच्या कारमध्ये बसली आहे आणि विकी कौशल रस्ता क्रॉस करून त्याच्या कारकडे जात आहे. दरम्यान, एक चाहता त्याच्या आवडत्या अभिनेत्रीला वडा पाव देतो. सारा आनंदाने ते घेते आणि स्वतः कडे ठेवते. साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या साधेपणाची चाहत्यांना खात्री पटली आहे. यूजर्स साराच्या कौतुकात कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'सारा खूप साधी आहे'. तर दुसऱ्याने लिहिले, 'सारा खूप गोड आहे.' त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान किती 'डाऊन टू अर्थ'आहे हे सगळ्यांच समजलं आहे. तुम्ही पाहिले असेल. ती एक अभिनेत्री आहे आणि त्याच बरोबर ती एवढ्या मोठ्या घराण्याची मुलगी आहे याचा तिला कसलाही अभिमान नाही. पैसा आणि पदाने माणूस मोठा होत नसतो हे साराने सिद्ध केले. सारा तिच्या वागण्याने लोकांची मने जिंकत आहे.हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पहिला जात आहे शिवाय चाहते भरभरून त्यावर लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा करत आहेत. सारा अली खान आणि विकी कौशल त्यांच्या आगामी 'द इमॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. या चित्रपटात सारा आणि विकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. सारा अली खान लवकरच अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार धनुष यांच्यासोबत आनंद एल राय दिग्दर्शित 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात साराची दुहेरी भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Sara ali khan

  पुढील बातम्या