Home /News /entertainment /

'खरंच तो खुप Hot आहे'... Sara Ali Khan चा 'या' सुपर स्टारवर जडला जीव

'खरंच तो खुप Hot आहे'... Sara Ali Khan चा 'या' सुपर स्टारवर जडला जीव

Sara Ali Khan

Sara Ali Khan

अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) सध्या तिच्या ‘अतरंगी रे’ (AtrangiRe ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने बॉलिवूडच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याच इच्छा दर्शवली आहे.

    मुंबई, 3 जानेवारी: अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) सध्या तिच्या ‘अतरंगी रे’ (AtrangiRe ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने बॉलिवूडच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याच इच्छा दर्शवली आहे. इतकेच नव्हे तर तिने 'वर्ल्ड फेमस लवर' (world famous lover) फेम स्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)आवडतो याबाबत उघड वक्तव्य केले आहे. नुकतंच साराचा अक्षय कुमार आणि धनुषसोबतचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीजच्या सहा दिवसानंतर या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणीदेखील होत होती. या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेत संबंध ‘लव्ह जिहाद’शी जोडला. यासर्वातच सारा अली खानने एका मुलाखतीदरम्यान आपली इच्छा व्यक्त केली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये, शाहरुख खान(Shah Rukh Khan), काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला आणि करण जोहर(Karan Johar) दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायचे आहे. अशी इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर तिने करण जोहर यांनी मी, विजय देवरकोंडा आणि जान्हवी कपूरसोबत (Jahnvi Kapoor) यांच्यासोबत बनवावा. जर करणने या चित्रपटाचा रिमेक करण्याचा विचार केला तर ती खूप चांगली कल्पना असेल. मला वाटतं तुम्ही त्यांना आता फोन करून ही कल्पना द्यावी. मला खात्री आहे की ते सहमत होतील, आपण हे केले पाहिजे. कूल’ आणि ‘हॉट’ तसेच, 'वर्ल्ड फेमस लवर' फेम स्टार अभिनेता विजय देवरकोंडा आवडतो याबाबत उघड वक्तव्य केले आहे. मुलाखतीदरम्यान, तिने विजयसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे म्हटले. यासोबतच, ‘कूल’ आणि ‘हॉट’ अशा शब्दात त्याचे वर्णन केले. सारा मुंबईत विजय देवरकोंडाला भेटली होती. तेव्हा तिने तेलुगु सुपरस्टारसोबतचा सेल्फीही सोशल मीडियावर शेअर केला होता. कुछ कुछ होता है हा 90 च्या दशकातील टॉप चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने 8 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोलचा हा लव्ह ट्रँगल लोकांना चांगलाच आवडला होता. ज्यासाठी या सर्व स्टार्सना अनेक पुरस्कारही मिळाले. काही दिवसांपूर्वीच सारा विजय देवरकोंडा, करण जोहर, मनीष मल्होत्रा, चार्मे कौर यांच्यासोबत पार्टी करताना दिसली होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Janhavi kapoor, Karan Johar, Sara ali khan, Shahrukh khan, Vijay deverakonda

    पुढील बातम्या