सिनेमात एकत्र काम करण्यासाठी सारा अली खाननं बाबा सैफसमोर ठेवली 'ही' अट

सिनेमात एकत्र काम करण्यासाठी सारा अली खाननं बाबा सैफसमोर ठेवली 'ही' अट

सारानं तिचे वडील सैफ अली खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यासोबत तिनं एक अट सुद्धा ठेवली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चलती आहे. मागच्या वर्षभरात अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराचा पहिलाच सिनेमा हिट झाला. त्यानंतर ती रणवीर सिंहसोबत सिंबामध्ये दिसली. हा सिनेमा सुद्धा सुपरहिट ठरला आणि साराकडे सिनेमांची रांगच लागली. पण आता सारानं तिचे वडील सैफ अली खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यासोबत तिनं एक अट सुद्धा ठेवली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सारानं तिच्या फिल्मी करिअरविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.

सुरुवातीला सारा बाबा सैफसोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. काही महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या सैफच्या जवानी जानेमन या सिनेमातून सारा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असं बोललं जात होतं. पण नंतर सारानं हा सिनेमा सोडला. ही भूमिका नंतर अलाया फर्निचरवालाला ऑफर करण्यात आली. पण आता सारानं पुन्हा एकदा सारानं सैफसोबत सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, मला आशा आहे की तो दिवस लवकरच येईल आणि मी बाबांसोबत सिनेमात काम करेन.

ब्रेकअप के बाद! 6 वर्षांचं नातं तुटल्यावर अभिनेत्रीनं सांगितलं रिलेशनशिपचं सत्य

 

View this post on Instagram

 

दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सैफसोबत काम करण्यासाठी मात्र साराची एक अट आहे. ज्याबद्दल बोलताना सारा म्हणाली, मी बाबांसोबत काम करायला तयार आहे मात्र त्यासाठी माझी एकच अट आहे ती म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट चांगली असायला हवी. जेव्हा एखादा चांगला प्रोजेक्ट असेल तेव्हा आम्ही दोघं प्रेक्षकांना ऑनस्क्रीन नक्कीच एकत्र दिसू. त्यांच्यासोबत एका सिनेमात काम करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

'तेरे बिना'मध्ये सलमानची ऑनस्क्रीन मुलगी साकारणारी 'ती' बालकलाकार आहे तरी कोण?

या मुलाखतीत सारा आपल्या वडीलांचा सिनेमा जवानी जानेमन बाबतही बोलली. ती म्हणाली, मी हा सिनेमा पाहिला. त्यात ते खूपच कूल, मजेदार अंदाजात दिसले. अलायानंही पहिल्याच सिनेमात कमालीचा अभिनय केला आहे. त्या दोघांमधली वडील-मुलीची केमिस्ट्री जबरदस्त होती. मी स्वतः जाऊन बाबांना सांगितलं होतं की मला त्यांचा सिनेमा खूप आवडला.

Lockdwon: 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

First published: May 13, 2020, 1:52 PM IST

ताज्या बातम्या