मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सारा अली खान-विकी कौशलची बाईक राईड; 'लुका छुपी 2' च्या सेटवरील VIDEO VIRAL

सारा अली खान-विकी कौशलची बाईक राईड; 'लुका छुपी 2' च्या सेटवरील VIDEO VIRAL

विकी आणि सारा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. नुकताच त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये विकी कौशल   (Vicky Kaushal)   रस्त्यावर बाईक चालवत आहे, तर सारा अली खान त्याच्या मागे साडी नेसून  बसली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 26  डिसेंबर-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री सारा अली खान   (Sara Ali Khan)  गेली अनेक दिवस आपल्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. तर अभिनेता विकी कौशल आपल्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होता. विकीने ९ डिसेंबरला कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांनतर आता विकी आणि सारा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. नुकताच त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये विकी कौशल   (Vicky Kaushal)   रस्त्यावर बाईक चालवत आहे, तर सारा अली खान त्याच्या मागे साडी नेसून  बसली आहे. अभिनेत्री सारा अली खान नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजाने प्रेक्षकांचं मन जिंकत असते. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या या लाडक्या लेकीने बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं असं खास स्थान निर्माण केलं आहे.आज साराच एक खास चाहतावर्ग आहे. सारा गेली अनेक दिवस आपल्या 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. या चित्रपटातील 'चका-चक' हे गाणं रिलीज झाल्यापासूनच प्रचंड लोकप्रिय झालं होतं. सारा प्रमोशनच्या ठिकाणी प्रत्येकाला या गाण्यावर नाचवत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात सारा सोबत अक्षय कुमार आणि धनुषसुद्धा आहेत. यांनतर सारा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं आहे. सारा सध्या अभिनेता विकी कौशलसोबत 'लुकाछुपी २' चं शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या सेटवरून काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये सारा अली खान आणि विकी कौशल बाईकवरून जात आहेत. यामध्ये दोघेही अतिशय साध्या लूकमध्ये दिसून येत आहेत. विकीने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातला आहे आणि सोबतच वर मफलर घेतला आहे. तर सारा अली खान पिवळ्या रंगाच्या गद्य सध्या साडीत दिसून येत आहे. यावरून चित्रपटात दोघेही एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिरेखा साकारत असल्याचं दिसून येत आहे. (हे वाचा:प्रियांकाला KISS करत पती निकने दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा; शेअर केला PHOTO ) सारा अली खान आणि विकी कौशल पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या नव्या जोडीला पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. साराने नुकताच एका मुलखतीमध्ये सांगितलं होतं, की 'विकीसोबत काम करायला मिळणार असल्याने मी फारच आनंदी आहे. तो एक फारच प्रभावी अभिनेता आहे. त्याच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळणार असल्याची अपेक्षा सारा अली खानने व्यक्त केली होती'. तर सारासोबत काम करत असल्याने विकीही आनंदी आहे. लग्नानंतर विकी पहिल्यांदाच शूटिंगवर परतला आहे.
First published:

Tags: Entertainment, Sara ali khan

पुढील बातम्या