शाहरुखला 'अंकल' म्हटल्यानं सारा झाली ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये 'वर्ड वॉर'

शाहरुखला 'अंकल' म्हटल्यानं सारा झाली ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये 'वर्ड वॉर'

फिल्म फेअर अवॉर्ड सोहळ्यात शाहरुखला अंकल म्हटल्यानं एकीकडे शाहरुखचे चाहते भडकलेले असताना दुसरीकडे साराचे चाहते तिच्या मदतीला धावून आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना अंकल किंवा आंटी म्हणणं अजिबात चुकीची गोष्ट नाही. मात्र हिच गोष्ट एखाद्या सेलिब्रिटीच्या बाबतीत घडली तर काय होतं? याचा अनुभव अभिनेत्री सारा अली खानला आला. फिल्म फेअर अवॉर्डदरम्यान सारानं बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला 'अंकल' म्हटलं आणि त्यानंतर दोघांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर 'वर्ड-वॉर' सुरू झालं. शाहरुखला 'अंकल' म्हणणं त्याच्या चाहत्यांना काही आवडलं नाही. त्यांनी साराला लगेचच ट्रोल करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर शाहरुख आणि साराच्या चाहत्यांमध्ये सध्या सोशल मीडियावर 'वाक् युद्ध' पाहायला मिळत आहे.

फिल्म फेअरसारख्या अवॉर्ड सोहळ्यात शाहरुखला 'अंकल' म्हटल्यानं एकीकडे शाहरुखचे चाहते भडकलेले असताना, दुसरीकडे साराचे चाहते तिच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर 'अंकल' या शब्दावरून आता शाहरुख विरुद्ध साराचे चाहते असं 'वर्ड-वॉर' सुरू झालं आहे. साराचा चाहता असलेल्या 'पंजाबी नागरिक' नावाच्या युजरनं ट्विट केलं की, 'सारानं फिल्म फेअर अवॉर्डमध्ये अंकल म्हटल्यानं तिला सर्व ट्रोल करत आहेत. तुम्ही 23 वर्षाच्या मुलीकडून 50 वर्षाच्या व्यक्तीला काय म्हणावं? अशी अपेक्षा करता. जी व्यक्ती तिच्या वडिलांपेक्षाही मोठी आहे. शाहरुखचे चाहते ही गोष्ट स्वीकारत नाहीत की त्यांचा हिरो आता एवढा मोठा झाला आहे की त्याला अंकल म्हटलं जाऊ शकतं.'पंजाबी नागरिकच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना नवीन बग्गा नावाच्या शाहरुखच्या चाहत्यानं म्हटलं की, 'हीच गोष्ट अशी पाहुया, शाहरुख खान अमिताभ बच्चन यांना अंकल म्हणाला तर कसं वाटेल. मी असं नाही म्हणत की शाहरुखला अंकल म्हटल्यानं त्याचा मान कमी झाला. पण 'सर' हा शब्द त्यावेळी अधिक योग्य ठरला असता.' पण हे सर्व इथंच थांबलं नाही नवीनच्या ट्वीटवर पंजाबी नागरिकनंही पुन्हा प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'शाहरुख अमिताभ बच्चन यांना अमित अंकल आणि जया बच्चन यांना जया आंटी असं म्हणतो. याशिवाय आदित्य चोप्रा आणि करण जोहरसुद्धा अमिताभ आणि जया यांना असंच बोलतात. तुमचा आयडियल हिरो आता 50 वर्षांचा झाला आहे. तर ही गोष्ट स्पष्ट आहे की, तो अंकल आहे'. मात्र हे सर्व सुरू असताना खुद्द शाहरुख किंवा सारा कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 09:52 PM IST

ताज्या बातम्या