सारा करतेय बॉलवूडमध्ये एन्ट्री

सारा करतेय बॉलवूडमध्ये एन्ट्री

साराच्या पहिल्या सिनेमाचं नाव 'केदारनाथ' आहे. हा सिनेमा जून 2018मध्ये रिलीज होणार आहे.

  • Share this:

09जुलै : सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.तिच्या सिनेमाचं नाव आणि रिलीज डेट नक्की झालीय.

साराच्या पहिल्या सिनेमाचं नाव 'केदारनाथ' आहे. हा सिनेमा जून 2018मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत हिरोच्या भूमिकेत आहे.सारा स्टुडंट आॅफ द इयर2 मध्ये प्रमुख भूमिका करणार असल्याची भरपूर चर्चा होती. पण ती भूमिका काही साराला मिळाली नव्हती.पण सारा आणि सुशांत सिंग केदारनाथमध्ये प्रमुख भूमिकेत असल्याचं तरण आदर्शनं ट्विट करून सांगितलंय. या सिनेमाची निर्मिती 'बालाजी' करणार आहे.

या सिनेमातील हिरो सुशांत सिंग राजपुत सध्यातरी 'चंदा मामा दुर के' या सिनेमाच्या शूटिंगसाठी नासाला जायच्या तयारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 01:27 PM IST

ताज्या बातम्या