सारा अली खान म्हणते, ‘मी बोलायला लागले तर रोज नवे वाद होतील’

मी बोलू लागले तर इथे रोज नव्या वादाला तोंड फुटेल असं विधान सारा अली खाननं एक मुलाखतीत केलं आहे. वाचा काय आहे कारण...

मी बोलू लागले तर इथे रोज नव्या वादाला तोंड फुटेल असं विधान सारा अली खाननं एक मुलाखतीत केलं आहे. वाचा काय आहे कारण...

 • Share this:
  मुंबई, 16 फेब्रुवारी : अभिनेत्री सारा अली खान मागच्या काही दिवासांपासून तिचा सिनेमा ‘लव्ह आज काल’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सारा अली खान नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. पण आता सारा तिच्या एका विधानमुळे खूप चर्चेत आली आहे. मी बोलू लागले तर इथे रोज नव्या वादाला तोंड फुटेल असं विधान सारा अली खाननं एक मुलाखतीत केलं आहे. सारा अली खाननं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिला राजकीय मुद्द्यांवर तू तुझं मत मांडताना कधीच दिसत नाही असं का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाला, मी या समाजाला बदलण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये आलेले नाही. या समाजाला मला काही संदेश द्यायचाच असेल तर त्यासाठी माझ्याकडे अनेक प्लाटफॉर्म आहेत. जर मला काही सल्ला अथवा संदेश द्यायचाच असेल तर मी एखादी डॉक्युमेंटरी करेन. पण मी असं करण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये आलेले नाही. मला चांगल्या कथांचा भाग होऊ इच्छिते. त्या कथांमधून मी लोकांपर्यंत पोहचू इच्छिते. त्यातील भूमिका मला साकारायच्या आहेत. श्रीदेवींची लेक स्वतःला मानते अंधश्रद्धाळू, वाचा काय आहे कारण
   
  View this post on Instagram
   

  I see you 👀 👓 Come see me, at the see-nima 🍿🎥 #LoveAajKal 💘💞

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

  सारानं या मुलाखतीत स्पष्ट केलं की सिनेमात साकारलेल्या भूमिका या तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. मागच्या काही काळात अनेक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी राजकीय विषयांवर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. यावर साराला तिचं म्हणणं विचारल्यावर ती म्हणाली, ‘अशा विषयांवर मी गप्प राहिलेलंच चांगलं आहे.’ मलायकामुळे सलमानसोबतचं नातं बिघडलं? बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा सारा पुढे म्हणाली, मी ज्याप्रकारची मुलगी आहे त्यानुसार जर मी या विषयांवर बोलायला सुरुवात केली तर या ठिकाणी रोज नवीन वादांना तोंड फुटेल. या ठिकाणी तुमच्या प्रत्येक वाक्याचं एवढं सुक्ष्म परिक्षण केलं जातं की हे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भटकवतात आणि मग माझ्यासारखे उत्साही लोक भयानक परिस्थितीमध्ये फसतात. त्यामुळे मला वाटतं की माझ्यापेक्षा माझं कामच बोलेल.
   
  View this post on Instagram
   

  ♠️♠️♠️ 📸: @shivangi.kulkarni

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

  14 फेब्रुवारीला रिलीज झालेला सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या लव्ह आजकल या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. या सिनेमात दोघांचीही ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या खूप गाजत आहे. या सिनेमात सारा आणि कार्तिक यांच्या व्यतिरिक्त रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सुहाना खानचं बॉलिवूड पदार्पण? बिग बॉस 13च्या स्पर्धकसोबत करणार रोमान्स
  First published: