मुंबईमध्ये लक्झरी कार नाही तर चक्क रिक्षातून फिरताना दिसली सारा अली खान

मुंबईमध्ये लक्झरी कार नाही तर चक्क रिक्षातून फिरताना दिसली सारा अली खान

सारा अली खान नेहमीच फोटोग्राफर्सशी प्रेमानं वागताना दिसते. तसेच तिचा देसी स्टाईलमध्ये नमस्कार करण्याचा अंदाजही बॉलवूडमध्ये खूप पॉप्युलर आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : बॉलिवूड पदार्पणातच 'केदारनाथ' आणि 'सिंबा' सारखे हिट सिनेमा देणारी पतौडी प्रिन्सेस सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या करणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी साराच्या न्यूयॉर्क ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. पण आता सारा आपली सुट्टी संपवून मुंबईमध्ये परतली असून तिने आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. दरम्यान नुकतंच साराला लग्झरी कार नाही तर चक्क ऑटोरिक्षातून फिरताना स्पॉट केलं गेलं.

 

View this post on Instagram

 

Good days bad days but a sweet gesture from #saraalikhan makes any day a good day

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सारा कधीही फोटोग्राफर्सना भेटते त्यावेळी ती नेहमीच त्यांच्याशी प्रेमाने आणि नम्रतेने वागताना दिसते. तिचा सर्वांना देसी स्टाईलमध्ये नमस्कार करण्याचा अंदाजही बॉलवूडमध्ये खूप पॉप्युलर आहे. यावेळीही ती काहीशा अशाच अंदाजात दिसली. सारा यावेळी जुहू परिसरात तिच्या मैत्रिणीसोबत चक्क रिक्षामधून उतरताना कॅमेऱ्यात कैद झाली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर्सनी साराला हाक मारल्यावर ती तिच्या खास अंदाजात हसून नमस्कार करताना दिसत आहे. एवढंच नाही तर, तुम्हाला कसं समजलं मी इथे आहे असंही सारानं यावेळी फोटोग्राफर्सना विचारल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

@saraalikhan95 #SaraAliKhan with #autorickshaw #snapped #in #juhu #today #mumbai #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

 

View this post on Instagram

 

@saraalikhan95 #SaraAliKhan snapped at juhu #today #mumbai #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

सारानं 2018मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमासाठी तिला फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला आहे. त्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानं सारा बराच काळ चर्चेत होती. लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अली यांच्या एका सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं नाव अद्याप समजलं नसलं तरीही हा सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल'चा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमा पुढील वर्षी व्हेलेंटाइन डे दिवशी रिलीज होणार आहे.

First published: April 26, 2019, 4:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading