VIDEO : सारा अली खाननं जान्हवी कपूरकडे केलं दुर्लक्ष, कॅट फाईट सुरू

VIDEO : सारा अली खाननं जान्हवी कपूरकडे केलं दुर्लक्ष, कॅट फाईट सुरू

अॅवाॅर्ड सोहळ्याला जान्हवीला अॅवाॅर्ड होतं, म्हणून ती आली होती. त्यावेळी सारा अली खान सिंबाच्या प्रमोशनसाठी आली होती. पण दोघींही एकमेकांना टाळत होत्या.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : या वर्षांनं बाॅलिवूडला दोन चांगल्या अभिनेत्री दिल्या. एक सारा अली खान आणि दुसरी जान्हवी कपूर. पहिल्यांदा जान्हवीचा 'धडक' रिलीज झाला. जान्हवी अनेकांची धडकन बनली. तर केदारनाथ सिनेमामुळे सारा अली खान समोर आली आणि सगळ्यांना आवडली.

जान्हवीनं काही दिवसांपूर्वी साराचं कौतुक केलं होतं. पण आता बहुदा दोघींमधली मैत्री संपून गेलीय. निमित्त होतं लोकमत अॅवाॅर्डचं. यावेळी जान्हवीला अॅवाॅर्ड होतं, म्हणून ती आली होती. त्यावेळी  सारा अली खान सिंबाच्या प्रमोशनसाठी आली होती. पण दोघींही एकमेकांना टाळत होत्या. एकमेकींकडे पूर्ण दुर्लक्ष करत होत्या.काही दिवसांपूर्वी केदारनाथच्या प्रीमियरला जान्हवी आली होती. तिनं साराचं कौतुकही केलं होतं. पण आता दोघींमध्ये हे कोल्ड वाॅर का सुरू झालंय, याचाच सगळे जण विचार करतायत.

साराचा दुसरा सिनेमा सिंबा पुढच्या आठवड्यात रिलीज होईल. सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खान सिनेमात उत्तम मराठी बोलताना दिसणार आहे. त्याचबरोबर सोनू सूद खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्टपणे दिसून येत आहे.

चित्रपटात रणवीर लाच घेणारा पोलीस दाखवण्यात आला आहे. एका घटनेनंतर अचानक त्याच्यात बदल झाल्यानं चित्रपाटात पुढे नेमकं काय घडणार हे ट्विस्ट असणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात अजय देवगणची झलकसुद्धा पाहायला मिळणार आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटात गाड्या उडवणाऱ्या रोहित शेट्टीने यावेळी वेगळ्या अंदाजमध्ये गाड्यांचा वापर केला आहे. सिनेमातील रणवीरची अॅक्शन स्टाईल आणि साराची मराठी डायलॉग डिलिव्हरी पाहायला प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. लग्नानंतर रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे.


Birthday special : गोविंदा आणि 'या' अभिनेत्रीच्या रिलेशनची त्याकाळी होती चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 11:42 AM IST

ताज्या बातम्या