एअरपोर्टवर लगेज सांभाळताना दिसली सारा अली खान, फॅन्स म्हणाले...

सारा नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 06:02 PM IST

एअरपोर्टवर लगेज सांभाळताना दिसली सारा अली खान, फॅन्स म्हणाले...

मुंबई, 7 ऑगस्ट : अभिनेत्री सारा अली खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पणातच एका मागोमाग एक दोन हिट सिनेमे दिले. याशिवाय सोशल मीडियावरही तिचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. त्यामुळे ती कुठेही गेली तरीही कॅमेरा तिची पाठ सोडत नाही आणि सारा सुद्धा नेहमीच सर्वांना हसून ‘नमस्ते’ करताना दिसते. त्यामुळे सध्या तिचा हाच अंदाज तिची ओळख बनला आहे. याशिवाय मागच्या काही दिवसांपासून ती कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. हे दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पण आता साराचा एक एअरपोर्ट व्हिडिओ नव्यानं व्हायरल होत आहे.

Article 370 : सिनेमाच्या 'या' नावासाठी निर्मात्यांची रीघ

सारा नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्या लगेज बॅग्स स्वतःच घेऊन जाताना दिसत आहे. सारा एकटी अशी स्टार किड आहे जी स्वतःचं सामान स्वतःच घेऊन जाताना दिसत आहे. एवढंच नाही तर अनेक प्रसिद्ध कलाकारही आपलं सामान कधीच स्वतः घेऊन जाताना दिसत नाहीत. त्यामुळे सध्या तिचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीनं आदेश भाऊजींना सांगितली 'ही' गोष्ट

एका युजरनं लिहिलं, सारानं दाखवून दिलं की, स्टार सुद्धा स्वतःचं काम स्वतः करू शकतात. कारण असे अनेक स्टार आहेत जे स्वतःला सामान्य लोकांपेक्षा वेगळं समजतात. पण सारा मात्र खूप वेगळी आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, सारा किती चांगली आहे जी स्वतःचं सामान स्वतः घेऊन जात आहे. ती कधीच स्टार किड असल्यासारखी वागत नाही. ती नेहमीच सामान्य माणसांसारखीच राहते आणि सर्वांना चांगली वागणूक देते.

Loading...

 

View this post on Instagram

 

Sara Ali Khan Clicked 📸 today at the Airport . . . #saraalikhan #actorslife #traveller #travellife #works #instatravel #airportstyle #airportspotting #bollywood #photography #paparazzi #mumbai #india #instagram #yogenshah @yogenshah_s @saraalikhan95

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

याशिवाय सारा मागच्या काही काळापासून सारा आणि कार्तिक यांच्या अफेअर्सच्या चर्चा आहेत. सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण आता कार्तिक आणि सारा त्यांच्या नात्याला पुढे नेण्याविषयीचा विचार करत आहेत आणि कार्तिकनं याची तयारीही सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.

जे. ओमप्रकाश यांच्या सिनेमांमध्ये A अक्षराचं होतं 'हे' रहस्य

वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर कार्तिक आणि सारा इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ मध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

================================================================

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...