कार्तिकसोबत सारा अली खान पोहोचली हॉस्पिटलमध्ये, 'हे' आहे कारण

कार्तिकसोबत सारा अली खान पोहोचली हॉस्पिटलमध्ये, 'हे' आहे कारण

नुकतंच सारा आणि कार्तिकला मुंबईमध्येच एका हॉस्पिटल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहेत. पहिल्यांदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं सांगत त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून सारा खूप चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक इव्हेंटमध्येही सारानं या गोष्टीचा उल्लेख केला होता आणि अचानक एका नाइट इव्हेंटमध्ये अभिनेता रणवीर सिंहने या दोघांची भेट घडवून आणली आणि त्यांच्या लिंकअपच्या चर्चा सुरु झाल्या. सध्या तर अनेक ठिकाणी हे दोघंही एकत्र दिसतात. नुकतंच सारा आणि कार्तिकला मुंबईमध्येच एका हॉस्पिटल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनला एका हॉस्पिटलबाहेर पाहण्यात आलं. त्यामुळे त्याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते मात्र याचा खुलासा आता झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून कार्तिकच्या वडीलांना हॉस्पिटमध्ये अ‍ॅडमिट आहेत. त्यांना भेटण्यासाठीच सारा कार्तिकसोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती. मात्र कार्तिकच्या वडीलांना हॉस्पिटमध्ये का अ‍ॅडमिट करण्यात आलं याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावरून सारा आणि कार्तिक एकमेकांबद्दल खूपच गंभीर असल्याचं बोललं जात आहे. तसेच कार्तिकही साराच्या फॅमिलीशी जवळीक साधताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी साराच्या रॅम्प डेब्यूच्या वेळी कार्तिक आणि साराचा भाऊ इब्राहिम यांच्यात खास बाँडिंग पाहायला मिळालं होतं.

सई ताम्हणकरचं नवं फोटोशूट Viral, तुम्ही पाहिला का तिचा पैठणी लुक?

सारा आणि कार्तिक लवकरच इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ मध्ये दिसणार आहेत. या सिनेमा दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढताना दिसली होती. या सिनेमाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी हे दोघं एकत्र दिसले. काही दिवसांपूर्वी तर साराच्या वाढदिवसाला कार्तिक तिला भेटण्यासाठी बँकॉकला पोहोचला होता. सारा बँकॉकला तिचा आगामी सिनेमा ‘कुली नंबर 1’चं शूट करत आहे. यावेळी कार्तिकनं सारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस असं कॅप्शन दिलं होतं.

‘पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, कोण अडवतो बघू’, मराठी अभिनेत्रीचं ओपन चॅलेंज

 

View this post on Instagram

 

Happy Birthday Princess @saraalikhan95 ❤️ And Eid Mubarak (this time without the mask )

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सारा आणि कार्तिक यांचा ‘लव्ह आज कल 2’ पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. कार्तिकच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तो अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर सोबत ‘पति पत्नी और वो’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय त्याच्याकडे जान्हवी कपूरसोबत ‘दोस्ताना 2’ आणि ‘भूल भूलैय्या 2’ असे दोन सिनेमा आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘भूल भूलैय्या 2’चं पोस्टर लॉन्च झालं होतं ज्यातील कार्तिकच्या लुकची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

सलमान-आलियाच्या ‘इन्शाअल्लाह’चं काय आहे हॉलिवूड कनेक्शन

==========================================================================

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

Published by: Megha Jethe
First published: August 25, 2019, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading