Throw back या फोटोतली अभिनेत्री तुम्हाला तरी ओळखता येईल का? आता आहे एकदम slim

या अभिनेत्रीचं वजन तेव्हा 96 किलो होतं. Throw back to when I couldn't be thrown अशी कॅप्शन तिने स्वतःच या फोटोला दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 08:56 PM IST

Throw back या फोटोतली अभिनेत्री तुम्हाला तरी ओळखता येईल का? आता आहे एकदम slim

मुंबई, 4 ऑगस्ट  : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगा सारा अली खानने तिच्या केदारनाथ आणि सिंबा या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सारा अॅक्टिव्ह असते. तिने शेअर केलेला एक Throw back फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत साराला ओळखणं कठीण जातंय एवढी ती लठ्ठ दिसते आहे.  Throw back to when I couldn't be thrown अशी कॅप्शन तिने स्वतःच या फोटोला दिली आहे. आई अमृता सिंग बरोबरच्या या फोटोत सारा चांगलीच जाड दिसते आहे. आत्ताची सारा आणि तेव्हाची सारा यात प्रचंड फरक झालेला दिसतो. मागे तिने दिलेल्या एका मुलाखतीत साराने आपलं वजन 96 किलो होतं, असं सारानेच सांगितलं होतं.

 

Loading...

View this post on Instagram

 

Throw to when I couldn’t be thrown☠️↩️ #beautyinblack

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा अली खानचा जवळचा मित्र आणि ज्याच्याबरोबर तिचं नाव जोडलं जातं तो अभिनेता कार्तिक आर्यन यानंसुद्धा या Throwback pic वर कमेंट केली आहे. ही मुलगी सारा अली खानसारखी दिसतेय असं त्यानं गमतीत म्हटलंय. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही कमेंट करून साराचं Hats off म्हणत कौतुक केलं आहे. तुझा हा फिटनेसचा प्रवास किती आव्हानात्मक असेल असं श्रद्धाने लिहिलं आहे.

संबंधित बातमी - गणपतीसमोरच्या या फोटोमुळे अजूनही ट्रोल होतेय सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. पण लॉ स्टुडंट ते अभिनेत्री हा साराचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पहिल्या दोन्ही सिनेमांत स्लीम ट्रीम दिसणारी सारा काही वर्षांपूर्वी तुम्ही पाहिली असती तर ही सारा अली खान आहे यावर कोणाचाच विश्वास बसला नसता.  सिनेमात येण्यापूर्वी साराचं वजन 96 किलो होतं. पण अभिनेत्री बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साराला जिममध्ये खूप घाम गाळावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत सारानं तिचा 'फॅट टू फिट' प्रवास सांगितला.

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुलगी बनली पोलीस अधिकारी

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारानं आपला अभ्यास पूर्ण करावा अशी तिच्या वडीलांची इच्छा होती. कॉलेजमध्ये असताना सारा खूप अभ्यासू होती. खाणं आणि अभ्यास एवढंच तिचं जग. ती न्यूयॉर्कमध्ये राहत असताना तिला जंक फूड खाण्याची सवय लागली होती. ज्यामुळे तिचं वजन 96 किलो पर्यंत वाढलं. अभ्यासासोबतच जेव्हा सारानं तिच्या अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नाबद्दल विचार करायाला सुरुवात केली त्यावेळी तिला लक्षात आलं की, हे असं आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही स्वीकारणार नाही. त्यामुळे तिनं हे वजन कमी करायचं ठरवलं.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा सांगते, 'सुरवातीला मी माझ्या खाणं, खाण्याच्या वेळा यावर नियंत्रण करायला सुरुवात केली. मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं. नियमित व्यायाम, सायकलिंग, बॉक्सिंग याच्या सहाय्याने मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली आणि या सर्वात आणखी एक गोष्ट मी केली होती ती म्हणजे मी माझ्या आईला पूर्ण एक वर्ष भेटले नव्हते किंवा तिच्याशी व्हिडिओ कॉल केला नव्हता. जेव्हा मी भारतात परतले तेव्हा तिनं मला माझ्या बॅगवरुन ओळखलं. एवढा माझ्या लुकमध्ये बदल झाला होता. पण ती माझ्यासाठी खूप आनंदी होती. आजही मी रोज कमीत कमी दीड तास व्यायाम करते.'

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan Fanpage (@saraalikhanfairy) on

बॉलिवूड पदार्पणातच 'सिंबा' आणि 'केदारनाथ' सारखेसुपरहिट सिनेमे देणाऱ्या साराला फिल्म फेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला आहे. लवकरच सारा कार्तिक आर्यन सोबत 'लव्ह आजकल'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन इम्तियाज अली करत असून हा सिनेमा 2020मध्ये व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित होणार आहे.

-------------------------------------

VIDEO: सलमानच्या घरी कतरिनाने केली बाप्पांची आरती, लेझिमवर धरला दबंगने ताल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...