साराचा श्रीलंकेच्या बीचवर Vacation; बिकिनी लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

श्रीलंकेला सारा तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत गेली असली तरी तिकडे 'Me Time' घालवायला ती विसरत नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 02:01 PM IST

साराचा श्रीलंकेच्या बीचवर Vacation; बिकिनी लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

मुंबई, 23 ऑक्टोबर- गेल्यावर्षी केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून फार व्यग्र होती. 'केदारनाथ' आणि 'सिंबा' या सिनेमात काम केल्यानंतर साराने इम्तियाज अली दिग्दर्शित लव आजकल 2 सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. या सगळ्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सध्या ती श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या वेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

Loading...

View this post on Instagram

 

Lady in Lanka ‍♀️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

या फोटोंमध्ये सारा तिच्या सुट्ट्या पूर्ण एन्जॉय करताना दिसत आहे. श्रीलंकेला सारा तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत गेली असली तरी तिकडे 'Me Time' घालवायला ती विसरत नाही. नुकतेच तिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. एका फोटोमध्ये ती समुद्र किनारी उभी आहे तर दुसऱ्या फोटोत ती स्वीमिंग पूलमध्ये कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे. तर स्वीमिंग पूलमधील अजून एका फोटोत ती नारळाचं पाणी पिताना दिसत आहे. साराने काही फोटो तिच्या इन्स्टास्टोरीमध्येही शेअर केले आहेत. आपले हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लेडी इन लंका'

साराही सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. तिने कोलंबिया यूनिवर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलं असून साराला नेहमीच एक अभिनेत्री व्हायचं होतं. कार्तिक आर्यनसोबत लव आजकल 2 सिनेमानंतर ती वरुण धवनसोबत कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

Birthday Bash बेधुंद होऊन नाचले मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर, पाहा Video

वयाच्या 46व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा,11वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...