96 किलोची सारा अली खान कशी झाली 'फॅट टू फिट'? अभिनेत्रीने शेअर केला VIDEO

96 किलोची सारा अली खान कशी झाली 'फॅट टू फिट'? अभिनेत्रीने शेअर केला VIDEO

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या 'फॅट टू फिट' प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये साराने घेतलेली मेहनत स्पष्ट झळकून येत आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जून : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. स्टारकिड असणाऱ्या साराने तिच्या 'बबली' स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दरम्यान सारा बॉलिवूडमध्ये  पदार्पण करण्याआधी तिचे वजन 96 किलो इतकं होतं, असं तिनेच एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. तिचे जुने फोटो देखील खूप व्हायरल होत असतात. मात्र साराने कधी तिच्या आधीच्या फोटोंबाबत, दिसण्याबाबत संकोच बाळगला नाही आहे. तिने वेळोवेळी तिचा अनुभव शेअर केला आहे. आता सुद्धा साराने तिच्या 'फॅट टू फिट' प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये साराने घेतलेली मेहनत स्पष्ट झळकून येत आहे. साराने तिच्या चाहत्यांना वेटलॉसची जर्नी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.

(हे वाचा-रिअल हिरो सोनू सूद आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक, जगतो रॉयल लाइफस्टाइल)

या व्हिडीओमध्ये तिचे काही जुने फोटो आणि सध्याचे फोटो तसंच वर्क आउटचे व्हिडीओ एकत्रित करण्यात आले आहेत. या व्हिडीओला तिने कॅप्शन देखील भन्नाट दिले आहे. 'सारा का सारा टू सारा का आधा', अशी स्वत:चीच गंमत करत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून तिचं विशेष कौतुक होत आहे.

View this post on Instagram

 

Episode 2: From Sara ka Sara to Sara ka aadha 🎃

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा तिच्या इन्स्टाग्रामवरून देखील काही मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या भारत भ्रमणाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिने ती भारतात जिथे जिथे फिरली आहे, तेव्हाचे काही क्षण एकत्र करून तिने हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता

 

View this post on Instagram

 

Episode 1: Bharat ‘State’ of Mind 🇮🇳 🌈☀️ Watch as IGTV video 🙌🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा अली खान 2021 मध्ये येणाऱ्या 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे.यामध्ये ती अक्षय कुमार आणि धनुष या तगड्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

First published: June 1, 2020, 8:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading