Home /News /entertainment /

सारा अली खान की आणखी कोण? हा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही व्हाल हैराण

सारा अली खान की आणखी कोण? हा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहिल्यावर ही सारा अली खान आहे की आणखी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

  मुंबई, 28 जानेवारी : अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडच्या हिट आणि फिट अभिनेत्रीपैकी एक मानली जाते. सध्या सारा तिचा आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’मुळे खूप चर्चेत आहे. अशातचत साराचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहिल्यावर ही सारा अली खान आहे की आणखी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडेल. सारा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला साराचा हा व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती फ्लाइटमध्ये बसलेली दिसत असून तिच्या मैत्रिणींचा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. या व्हिडीओमधील तिचे एक्सप्रेशन्स फारच गोड आहेत. तर व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला ‘सर जो तेरा चकराए…’ गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सारानं लिहिलं 'हाजिर है सारा का सारा सारा। जो पहले था उसे 'हल्का' बना लीजिए। जो यह पहले थे उससे भी 'हल्का' बना लीजिए।' 'गणेश आचार्य जबरदस्तीनं दाखवतो अडल्ट VIDEO', महिला कोरिओग्राफरचा खळबळजनक आरोप
  या व्हिडीओमध्ये सारा खूपच जाड दिसत आहे. हा तिचा व्हिडीओ ती बॉलिवूडमध्ये येण्याआधीचा आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सारानं तिच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली. तिच्या सध्याच्या लुकचं क्रेडिट तिनं तिच्या जिम ट्रेनरला दिलं आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी साराचं वजन 96 किलो होतं. पण आज सारा बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री आहे. आपलं वजन कमी करण्यासाठी सारानं 4 महिने प्रचंड मेहनत घेतली होती. दरम्यानच्या काळात तिनं आईला भेटणं कटाक्षाणं टाळलं होतं. 4 महिन्यात तिनं 30 किलो वजन कमी केलं आणि जेव्हा ती मुंबई एअरपोर्टवर तिला ओळखणंही कठीण झालं होतं तिच्या आईनं तिच्या बॅगवरुन तिला ओळखलं होतं. ‘माझं कुटुंब तुटेल अशा गोष्टीला मी पाठिंबा देऊ शकत नाही’, पूजा भटचा CAA ला विरोध
  View this post on Instagram

  Some people are black and white... Then there’s Zoe #WorkingWomen #WorkingWeekend #bts #LoveAajKal ❤️

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

  सारा लवकरच ‘लव्ह आज कल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि कार्तिक आर्यनचा रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. हा सिनेमा 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांचं असून हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-वडीलांच्या लग्नाआधीच झाला अभिनेत्रीचा जन्म, ब्रेकअपनंतर गेली नशेच्या आहारी
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sara ali khan

  पुढील बातम्या