Home /News /entertainment /

अभिनेत्री सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ फुटला वीजेचा बल्ब, पाहा VIDEO

अभिनेत्री सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ फुटला वीजेचा बल्ब, पाहा VIDEO

Sara Ali Khan

Sara Ali Khan

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र तिच्या चित्रपटाच्या सेटवरील मेकअप रुममध्ये एक अपघात झाला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुंबई, 24 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत (Sara Ali Khan Met An Accident) नुकतीच एक दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फारच घाबरवणारा असून सारा अली खानने हा तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर शेअर केला आहे. या प्रसंगाला साराने हॉरर घटना असं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सारा मेकअपरूममध्ये बसली असून तिने गुलाबी रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. तर मेकअप आर्टिस्ट नेहमीप्रमाणे साराच्या चेहऱ्यावर टचअप करताना दिसत आहे. सारा अली खान (Sara Ali Khan Bulb Blast Video) या व्हिडिओदरम्यान कोणाला तरी सांगते की, ‘जीतूला सांग दोन नारळपाणी आणून दे.’ असं म्हणत म्हणत सारा मेकअप पाहू लागते आणि टचअप करून मेकअप आर्टिस्ट तिथून निघून जातो. तेव्हाच अचानक सायरनसारखा जोरदार आवाज येतो आणि साराच्या जवळ असलेल्या वीजेच्या बल्बचा स्फोट होतो. अचानक झालेल्या बल्बच्या स्फोटाच्या आवाजाने सारा घाबरून जाते. सारा अली खान (Sara Ali Khan Video) ने हा व्हिडिओ शेअर करत हॉररवाल्या इमोजीसोबत ‘मॉर्निंग लाइक धिस’ असं लिहीलं आहे. तिने बल्ब आणि ब्लास्टचा इमोजीही आपल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये टाकला आहे. आता साराचा हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक फॅन्स तिच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. पण ती सुरक्षित आहे. वीजेचा बल्ब फुटल्याने तिला इजा झालेली नाही. नर्मदे दातीरी एन्जॉय करतेय सारा खरं तर सारा अली खानने या व्हिडिओनंतर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका मंदिरासमोर बसली आहे आणि हे मंदिर नर्मदा नदीच्या किनारी आहे. यामध्ये साराने पर्पल रंगाचा ड्रेस घातला असून ती खडकावर बसली आहे. या फोटोसोबत तिने फॅन्ससोबत लोकेशनही शेअर केलं आहे. या फोटोसाठी तिने ‘नर्मदा तट, महेश्वर’ असं कॅप्शन लिहीलं आहे. त्यामुळे साराच्या फॅन्सनी चिंता करण्याचं कारण नाही. विक्की कौशल आणि सारा अली खान इंदूरमध्ये करत आहेत शूटिंग सारा अली खानने इन्स्टाग्रामवर तिच्या स्टोरीमध्ये अजूनही दोन-तीन व्हिडिओ शेअर केले आहेत. सध्या सारा मध्य प्रदेशमधील इंदूर (Indore) येथे आहे. ती अभिनेता विकी कौशलसोबत आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. असं म्हटलं जात आहे की, दोघं ‘लुका छुपी-2’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या व्हिडओमधील हा बल्ब अगदी साराच्या चेहऱ्याजवळ नव्हता हे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे ती सुखरूप असेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Sara ali khan

    पुढील बातम्या