Home /News /entertainment /

अ‍ॅक्टिंग करिअरसाठी Sara Ali Khan ला आई अमृता सिंगने दिला होता मौलिक सल्ला, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

अ‍ॅक्टिंग करिअरसाठी Sara Ali Khan ला आई अमृता सिंगने दिला होता मौलिक सल्ला, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

नव्या पिढीतल्या कलाकारांमध्ये सारा अली खानला (Sara Ali Khan) सर्वांत प्रॉमिसिंग अभिनेत्री मानलं जातं. साराला वडील सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आई अमृता सिंग (Amrita Singh) यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. पण साराला पदार्पणापूर्वी आईने अ‍ॅक्टिंग करिअरसाठी नकार दिला होता.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली,17 जानेवारी:  सध्या बॉलिवूडमध्ये नवोदित कलाकारांची एक मोठी फळी तयार झाली आहे. या कलाकारांच्या रूपाने बॉलिवूडला प्रॉमिसिंग टॅलेंट मिळालं आहे. नव्या पिढीतल्या कलाकारांमध्ये सारा अली खानला (Sara Ali Khan) सर्वांत प्रॉमिसिंग अभिनेत्री मानलं जातं. 'केदारनाथ' (Kedarnath) या आपल्या पहिल्याच चित्रपटातून तिनं अभिनय कौशल्य सिद्ध केलं होतं. साराला वडील सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आई अमृता सिंग (Amrita Singh) यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. विशेष म्हणजे अभिनयाशिवाय सारा अली खान अभ्यासातदेखील नेहमी पुढे राहिली आहे. तिनं अमेरिकेतल्या प्रतिष्ठित कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. यामुळे अनेकांना तिच्या बॉलिवुडमध्ये येण्याच्या निर्णयाबाबत आश्चर्यही वाटलं होतं.

  आईनं दिला होता नकार

  सारा अली खानला लहानपणापासूनच हिरॉइन बनण्याची इच्छा होती. याबाबत तिनं सर्वांत अगोदर आई अमृता सिंगजवळ आपली ही इच्छा बोलून दाखवली होती. एका मुलाखतीत सारानं याबाबत खुलासा केला होता. जेव्हा सारानं अभिनय (Acting) करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा अमृता सिंगनं तिला स्पष्ट नकार दिला होता. 'आता टुणटुणचा जमाना राहिलेला नाही,' अशा शब्दांत अमृतानं आपल्या मुलीला वास्तवाची जाणीव करून दिली होती. शिक्षण घेत असताना सारा अली खान लठ्ठ (Chubby) होती. तिची फिगर (Figure) एखाद्या बॉलिवुड हिरॉइनला शोभेल अशी अजिबात नव्हती. अमृता सिंगनं या गोष्टीची आपल्या मुलीला जाणीव करून दिली होती. 'माझी आई मला लठ्ठपणाबद्दल बोलली होती; मात्र यामागे माझी खिल्ली उडवण्याचा उद्देश नव्हता. बॉलिवूडमध्ये अॅक्टिंग करायची असेल तर फिटनेसवर (Fitness) प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, हे त्यातून आईला सुचवायचं होतं,' असं सारानं मुलाखतीत सांगितलं होतं. आईच्या सल्ल्यानंतर सारानं आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली आणि वजन कमी केलं होतं. साराचा 'लव्ह आज कल 2' (Love Aaj Kal 2) हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर तिच्या आईनं तिला सल्ला दिला होता. 'लोकांना तुझं काम आवडत नसेल तर याचा अर्थ तू योग्य पद्धतीनं काम करत नाहीस. तुला आणखी मेहनत घेण्याची गरज आहे,' असं अमृता सिंग मुलीला म्हणाली होती. सारानं अमृता सिंगच्या या गोष्टी गांभीर्याने घेतल्या आणि स्वतःवर मेहनत घेतली. त्यानंतर हॉटस्टारवर साराचा 'अतरंगी रे' (Atrangi Re) हा चित्रपट रिलीज झाला. आनंद एल. रॉय दिग्दर्शित चित्रपटात धनुष, सारा आणि अक्षयकुमार मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांनी साराच्या त्यातल्या अॅक्टिंगचं कौतुक केलं आहे. आमिर घटस्फोटानंतरही किरणला नाही विसरू शकला; तिच्यासाठी करणार.... सध्या सारा अली खान इंदूरमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. गेल्या शनिवारी (15 जानेवारी) अमृता सिंग आपल्या मुलीला भेटण्यासाठी इंदूरला गेली. दोघींनी मिळून तिथे महाकालाचं दर्शनही घेतलं.
  First published:

  Tags: Bollywood actress, Saif Ali Khan, Sara ali khan

  पुढील बातम्या