S M L

'या' विचित्र सवयीमुळे सारा अली खाननं मागितली रणवीर, सुशांतची माफी

आपल्या विचित्र सवयीचा मजेशीर किस्सा सारानं एका मुलाखती दरम्यान सांगितला.

Updated On: Mar 16, 2019 06:52 AM IST

'या' विचित्र सवयीमुळे सारा अली खाननं मागितली रणवीर, सुशांतची माफी

मुंबई, 16 मार्च : पतोडी प्रिंसेस सारा अली खान सध्या कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. पण सारानं स्वतःबद्दल नुकताच एक आश्चर्यजनक खुलासा केला. एका मुलाखतीत तिनं स्वतःची अशी एक सवय सांगितली ज्यामुळे तिला रणवीर सिंग आणि सुशांत सिंग राजपूतची माफी मागावी लागली होती. तिच्या या विचित्र सवयीमुळे सेटवरील सर्वजण तिच्यापासून दूर पळायचे. पण इच्छा असूनही सारा ती सवय सोडू शकली नाही. आपल्या या विचित्र सवयीचा मजेशीर किस्सा सारानं एका मुलाखती दरम्यान सांगितला.

साराला नेहमीच कॉस्मेटिक उत्पादनांपेक्षा आयुर्वेदिक उत्पादनं वापरायला आवडतात. त्यामुळे ती शक्य असेल तिथं आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करते. सारा केसांना हेअर कंडिशनर नाही तर कांद्याचा रस लावते. सारा म्हणाली की, 'मी केसांना चमकदार करण्यासाठी कांद्याचा रस लावते. यामुळे केस खूप सुंदर दिसतात. पण त्यामुळे माझ्या सहकलाकारांना त्रास होतो. शूटिंगच्या वेळी जेव्हा केसांना कांद्याचा रस लावायचे तेव्हा अगोदर माझ्या सहकलाकारांना याची आधीच कल्पना देत असे.'

सारा पुढे म्हणाली, 'एकदा रणवीरनं मला विचारलं की, तू असं का करतेस तेव्हा मी त्याला केसांना चमकदार करण्यासाठी मी हा उपाय करते असं सांगितलं. आता तुला याचा वास सहन करावा लागेल असं सांगत मी त्यांची माफी मागितली.' असा खुलासा सारानं या मुलाखतीमध्ये केला.


सारा अली खानची एका मागोमाग एक प्रदर्शित झालेले, 'केदारनाथ' आणि 'सिंबा' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. त्यानंतर साराचे चाहते मोठ्या प्रमाणात वाढले आणि ती अभिनयाच्या बाबतीत ती प्रॉमिसिंग स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

वाचा : प्रियांका चोप्रानं पती निकला एक्स गर्लफ्रेंडसोबत बोलताना पकडलं, अन्...


वाचा : काय म्हणता, रणवीर-दीपिकानं वरुण धवनला 'दत्तक' घेतलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close