मुंबई, 11 जुलै : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. सारानं तर अगोदरच कार्तिक तिला आवडत असल्याचं कबुल केलं आहे. त्यानंतर या जोडीची सगळीकडे चर्चा सुरू झाली. कार्तिकनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरीही अनेकदा हे दोघंही एकत्र फिरताना दिसतात. लवकरच हे दोघं इम्तियाज अलींच्या ‘लव्ह आज कल 2’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाचं शूट आटोपून सारा व्हेकेशनसाठी लंडनला रवाना झाली होती. पण सुट्टी संपवून परतलेली सारा काल रात्री मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली आणि त्याचवेळी अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा या ठिकाणी दिसला. त्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारा अली खान आई अमृता सिंग आणि भाऊ अब्राहम यांच्यासोबत नुकतीच मुंबईला परतली. यावेळी तिनं नेहमीप्रमाणं हसून देसी स्टाइलमध्ये फोटोग्राफर्स आणि चाहत्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर ती तिच्या कारमध्ये बसून घरी रवाना झाली. मात्र याचवेळी अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा एअरपोर्टवर स्पॉट झाला मात्र फोटोग्राफर्सना पाहताच त्यानं आपला चेहरा हातानं झाकून घेतला. त्यानंतर साराच्या मागोमाग तो सुद्धा आपल्या कारमधून निघून गेला. कार्तिकला एअरपोर्टला पाहिल्यावर तो साराला पिकअप करण्यासाठी त्या ठिकाणी आला होता अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
The Lion King मधून शाहरुखच्या मुलाचा डेब्यू, प्रेक्षकांना आर्यनच्या आवाजाची भुरळ
सारा आणि कार्तिक यांच्यातील जवळीक वाढत असताना एकीकडे साराची आई अमृता या नात्याविषयी तितकीशी खुश नाही. यामुळे साराचं कामावरील लक्ष विचलित होत असल्याचं बोललं जात आहे. असं तिचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे कार्तिकला मात्र साराचा विरह सहन होत नसल्याचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसत आहे. त्यानं नुकताच एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला त्यानं ‘If i miss you ‘ had a face’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांनी ‘तू साराला मिस करत आहेस का’ असं विचारलं आहे. तर काहींनी त्याला, ‘तु लवकरच साराला प्रपोझ कर’ असा सल्ला दिला आहे.
बॉयकॉट केलेलं असतानाही कंगना घेतेय सर्वाधिक मानधन, या आहेत टॉप 10 अभिनेत्री
सारा अली खाननं गेल्यावर्षी ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. या सिनेमानंतर ती रणवीर सिंगसोबत ‘सिंबा’ सिनेमातही दिसली होती. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले होते. सारा अली खान सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीपासूनच चर्चेत होती. त्यामुळे आता साराचा तिसरा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल. ‘लव्ह आज कल 2’ 14 फेब्रुवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म
=================================================================
VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली