VIDEO : रागानं लाल झाली सारा अली खान, म्हणाली; माझ्या बॉयफ्रेंडशी...

VIDEO : रागानं लाल झाली सारा अली खान, म्हणाली; माझ्या बॉयफ्रेंडशी...

नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सारा अली खान रागानं लाल झालेली पाहायला मिळाली.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : अभिनेत्री सारा अली खान मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तिचा लव्ह आज कल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र तिच्या आणि कार्तिक आर्यनच्या ऑफ आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा मात्र जोरदार झाली. अनेकदा तर प्रमोशन इव्हेंटमध्ये चाहत्यांकडून साराला भाभी अशी हाकही मारली गेली. त्यानंतर आता एका व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंडबद्दल बोलताना सारा अली खान रागानं लाल झालेली पाहायला मिळाली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सारा अली खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती गली सिनेमातील आलिया भटचा लोकप्रिय डायलॉग, ‘मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलूगुलू करेगी तो...’ वेगवेगळ्या अंदाजात बोलताना दिसत आहे. तिच्या व्हिडीओला खूप लाइक्स मिळत आहेत. तीन वेगवेगळ्या अंदाजात हा डायलॉग बोलताना सारा खूपच क्यूट दिसत आहे.

वरुण धवन आहे अब्जावधींचा मालक, वाचा किती आहे त्याची एकूण संपत्ती

 

View this post on Instagram

 

Cute ya overacting? Follow @bigbollywoodpage 🌈 . . . . . . . . . . . . . . . . . . . . #sara #saraalikhan #saralikhan #saraalikhanpataudi #saraalikhanfc #acting #overacting #bollywood #bollywoodactress #actress #bollywoodvideo #bollywoodmovies #bollywoodstyle #aliabhatt #dialogue

A post shared by Big Bollywood (@bigbollywoodpage) on

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला ज्यात 'गली बॉय' या सिनेमाला सर्वाधिक 13 अवॉर्ड मिळाले. या सिनेमानं 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाचा विक्रम मोडला. गली बॉय सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तरनं केलं होतं. तर निर्मिती जोया अख्तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची होती.

सनी लिओनी जखमी झाली की काय? मेकअप बघून चाहते झाले हैराण, पाहा VIDEO

 

View this post on Instagram

 

A humble bunch! *drops mic walks away* 🎤💗 #gullyboy

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिनं नुकतंच वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'च्या रिमेकचं शूटिंग पूर्ण केलं. 1995 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमा गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता या सिनेमाचा रिमेक बनवण्यात आला आहे. या दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनीच केलं आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला साराचा 'लव्ह आज कल' बॉक्स ऑफिसवर जेमतेम चालला मात्र साराच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

त्या रात्री नेमकं काय झालं? अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूचं न उलगडलेलं कोडं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2020 11:00 AM IST

ताज्या बातम्या