सारा अली खानच्या बालपणीचा 'हा' व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

sara ali khan viral video साराच्या एका फॅनपेज वरून तिचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात ती खूपच क्यूट दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 07:24 PM IST

सारा अली खानच्या बालपणीचा 'हा' व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

मुंबई, 19 जून : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा सध्या तिचा आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल 2’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. फादर्स डेच्या निमित्तानं सारानं सैफ सोबतचे तिचे जुने फोटो शेअर करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यानंतर आता साराच्या बालपणीचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा सारा तैमुरच्या वयाची होती. साराच्या एका फॅनपेज वरून तिचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात ती खूपच क्यूट दिसत आहे.

'शिवाजी महाराजांच्या हत्येपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत सगळ्याच्या मागे RSS'
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला साराचा हा व्हिडिओ कोणत्या सिनेमाच्या सेटवरील असून शूटिंग दरम्यान सैफ आपल्या मुलीसोबत खेळत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत सारा ऑरेंज कलरचं फ्रॉक आणि दोन पोनीटेलमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. काहींनी या व्हिडिओमधील तिच्या निरागसतेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी स्टार किड तैमुरची तुलना त्याच्या मोठ्या बहिणीशी म्हणजे साराशी केली आहे.

रोशन कुटुंबीयांच्या वादात नवा ट्विस्ट, कंगनाच्या बहिणीचा हृतिकवर गंभीर आरोप
सारानं काही दिवसांपूर्वी तिच्या बालपणीच्या आठवणी जागवत बाबा सैफसोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंना कॅप्शन देताना सारानं लिहिलं, ‘नेहमीच माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहण्यासाठी धन्यवाद, तुम्ही मला सांगितलं की, कसं शिकायचं, मला पहिला पाऊस दाखवला, तुम्ही नेहमीच माझ्याशी धीर आणि प्रेमानं वागलात आणि मी दिलेला त्रासही सहन केला. हॅप्पी फादर्स डे.’ या सर्व फोटोंमध्ये सारा तिच्या बाबांसोबत खेळताना दिसत आहे. सारा ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे. 2004मध्ये अमृता आणि सैफनं घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याच्या आयुष्यात करिना आली. सारा आणि तिची सावत्र आई करिना यांच्या खूप चांगलं बॉन्डिग आहे. अनेकदा त्या दोघी एकत्र हँगआउट करताना दिसतात.

गौतम बुद्धांच्या मूर्तीवर बसून फोटो काढल्यानं आयुष्यमान खुरानाच्या पत्नीवर टीका
 

View this post on Instagram
 

My Easter Bunnies #munchkins #brothersinarms #doubletrouble


A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


=================================================================


VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close