कार्तिक आर्यनसोबत बाइकवर बसण्यासाठी सारा अली खान घेते पैसे? VIDEO VIRAL

कार्तिक आर्यनसोबत बाइकवर बसण्यासाठी सारा अली खान घेते पैसे? VIDEO VIRAL

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सारानं कार्तिकसोबत ‘लव्ह आज कल 2’च्या शूटिंगबाबतचा अनुभव शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान बॉलिवूडमधील क्यूट कपल मानलं जातं. प्रत्येक दिवशी या दोघांबद्दल काही ना काही नवीन ऐकायला मिळतंच. एकमेकांसोबत टाइम स्पेंड करण्यापासून ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यापर्यंत सर्वच बाबतीत हे दोघंही चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी तर सारा कार्तिकला भेटायला चक्क लखनऊला पोहचली होती. त्यानंतर सारानं नुकताच रॅम्प डेब्यू केला. यावेळी तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि कार्तिक आर्यन दिसले होते. या दोघांमध्येही खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं यावेळी दिसून आलं.

हिरोला 442 रुपयांना 2 केळी देणं भोवलं, हॉटेलला इतक्या हजारोंचा फटका

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सारानं कार्तिकसोबत ‘लव्ह आज कल 2’च्या शूटिंगबाबतचा अनुभव शेअर केला. सारा म्हणाली, मी खूप एजॉय केलं, माझ्यासाठी प्रत्येक दिवस सुंदर होता. सेटवर घालवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी खास होता. मला वाटतच नव्हतं की, मी शूट करत आहे. मी काम करत आहे असं मला कधीच जाणवलं नाही. यावर मी विनेद करत असे की, मला कार्तिक आर्यनच्या बाइकवर बसण्याचे पैसे मिळतात. कारण कोणतीही मुलगी हे पैसे न घेता करण्यास तयार होती. पण मला मात्र त्याचे पैसे मिळत होते. मी संपूर्ण टीसोबच खूप मजा केली.

एका अफवेमुळे बदललं धनुषचं आयुष्य, असा झाला सुपस्टार रजनीकांत यांचा जावई

कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये सारानं तिला कार्तिक आवडत असल्याचं सांगत त्याला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. जेव्हा कार्तिकला हे समजलं किंवा जेव्हाही विचारलं गेलं तेव्हा प्रत्येक वेळी तो लाजताना दिसला होता. त्यानंतर एका इव्हेंट नाइटमध्ये रणवीर सिंहनं त्या दोघांचीही ओळख करुन दिली होती. या दोघांची वाढती लोकप्रियाता पाहून दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी त्यांना ‘लव्ह आज कल 2’साठी कास्ट केलं. त्यांचा हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेंटाइन डे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिरोला 442 रुपयांना 2 केळी देणं भोवलं, हॉटेलला इतक्या हजारोंचा फटका

==========================================================================

सिंघम स्टाईलमुळे पोलिसांची नोकरी धोक्यात, VIDEO VIRAL

First published: July 28, 2019, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading