सारा अली खानला मिळाला तिसरा मोठा सिनेमा

सारा अली खानला मिळाला तिसरा मोठा सिनेमा

जान्हवी कपूरला कसे एकदम सिनेमे मिळायला लागले, तसे सारा अली खानलाही. सिंबा रिलीज होण्याआधीच साराला तिसरा मोठा सिनेमा मिळालाय.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं. तिचा पहिला सिनेमा केदारनाथचं खूप कौतुक होतंय. विशेष करून तिच्या भूमिकेचं. तिचा सिंबाही आता रिलीज होईल.

जान्हवी कपूरला कसे एकदम सिनेमे मिळायला लागले, तसे सारा अली खानलाही. सिंबा रिलीज होण्याआधीच साराला तिसरा मोठा सिनेमा मिळालाय. या सिनेमाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत.

टायगर श्राॅफसोबत साराला तिसरा सिनेमा मिळालाय. बागी 3 सिनेमात सारा आणि टायगर दिसतील. बागी आणि बागी 2च्या यशानंतर निर्मात्यानं बागी 3 काढण्याचा निर्णय घेतलाय. आधीच्या दोन सिनेमांमध्ये खूप अॅक्शन पाहायला मिळाली होती.

काॅफी विथ करण शोमध्ये सारानं सांगितलं की तिचं आजारामुळे वजन वाढलं होतं. तिच्या आजाराचं नाव आहे पीसीओएस. यात ओव्हरीजमध्ये गाठी येतात. यात वजनही खूप वाढतं. आणि मग ते कमी करणं हे खूप मोठं आव्हान असतं.

साराचंही वजन 96 किलो झालं होतं. तिनं ते प्रयत्नपूर्वक कमी केलं. करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान आले आहेत. या शोमध्ये दोघांनीही फार धमाल केल्याचं दिसलं.

वीकेण्डला करिना सैफसोबत केदारनाथ पाहायला गेली होती. तिला साराची भूमिका खूप आवडली. मिड डेशी बोलताना करिना म्हणाली, 'सारा चांगली अभिनेत्री बनणार, यात शंका नाही. ती सिनेमेही चांगले निवडते.' साराचा आता सिंबाही रिलीज होणार आहे. त्यात ती बबली गर्ल आहे.

करिना कपूर सारासाठी पार्टी ठेवणार आहे. सैफ आणि साराचे जवळचे मित्रमैत्रिणी या पार्टीत असतील. सारा आणि करिना यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत.

रणवीरसाठी लकी ठरली दीपिका, पहा कोणाला कुठला मिळाला अॅवाॅर्ड?

First published: December 17, 2018, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading