काय झालं हिला? अशा अवस्थेतही प्रेक्षकांना हसवणाऱ्या साराचं VIDEO मुळे होतंय तुफान कौतुक

डॉक्टरांनी दिलेल्या गुंगीच्या औषधाच्या अंमलाखाली ' नमस्ते दर्शको' असं म्हणून सारा काय सांगतेय? पाहा भन्नाट VIDEO

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी: आपल्या चाहत्यांची सतत करमणूक कशी करायची, याचं कौशल्य सारा अली खानने (Sara Ali Khan) उत्तम पद्धतीने आत्मसात केलेलं आहे. आता एका तिच्या एका ताज्या व्हिडीओचंच उदाहरण पाहा ना.. ती स्वतःवरच्या सर्जरीसाठी (Surgery) जात असतानाही ती लोकांना हसवू शकते, हे त्यातून पाहायला मिळालं. बुधवारी (१० फेब्रुवारी) साराची अक्कलदाढ (Wisdom Tooth) काढण्यात आली. आपल्या चाहत्यांना तिला ही बातमी तर द्यायचीच होती आणि सोबत मनोरंजनही करायचं होतं.

म्हणून तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती बोलताना दिसतेय आणि ती नीट बोलू शकत नाहीये, हेही त्यात दिसतंय. ती व्हिडिओ क्लिप सुरू होते साराच्या 'नमस्ते दर्शकों' या शब्दांनी. आपली अक्कलदाढ काढली जाणार असल्यामुळे आत्ता आपण नीट बोलू शकत नाही आहोत, हे तिनं सांगितलं. त्यानंतर जे दंतवैद्य तिची अक्कलदाढ काढणार होते, तिची ओळखही तिने व्हिडिओतून करून दिली. आजच्या दिवसाचं आपलं हेच नियोजन असल्याचं साराने सांगितलं. क्लिपच्या शेवटी साराने आपली सर्जरी व्यवस्थित पार पडल्याचं आणि अक्कलदाढ नीटपणे काढून झाल्याचं सांगितलं. व्हिडिओखाली लिहिलेल्या ओळीत साराने आपल्या अक्कलदाढेला 'गुडबाय'ही केलं आहे.

साराने शेअर केलेला हा व्हिडिओ अगदी थोड्या कालावधीतच व्हायरल झाला. तिच्या चाहत्यांना हसू आवरलं नाही. चाहत्यांनी तिच्या व्हिडिओ पोस्टवर लाइक्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव पाडला. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये हसऱ्या इमोजी टाकल्या आहेत. 'इतक्या वेदना होत असताना फक्त तूच 'नमस्ते दर्शकों'च्या एपिसोडचा विचार करू शकतेस,' अशी प्रतिक्रिया एकाने लिहिली आहे.

 हे देखील वाचा -  VIDEO: सानिया मिर्झाबरोबर एक दिवस! जिम, टेनिस, फोटोशूट, मुलाखती आणि मुलाची गोंडस लुडबुडही

काही दिवसांपूर्वी साराने  चाहत्यांसाठी आपले फोटो शेअर केले होते. त्या फोटोत तिने फरचा हुडी ड्रेस आणि ब्लॅक प्रिंटेड सॉक्स घातले होते. 'स्वेटर डेज अँड विंटर हेझ, सरसों का साग अँड गोल्डन रेज' अशी कावात्म शैलीतली ओळ तिने त्या फोटोखाली लिहिली होती.

आनंद एल. राय यांच्या अतरंगी राय (Atrangi Rai) या आगामी चित्रपटात सारा अली खान धनुष आणि अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तसंच, साराने टायगर श्रॉफसोबत 'बाघी 4' हा सिनेमाही साइन केला आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 11, 2021, 9:32 PM IST

ताज्या बातम्या