मुंबई, 4 डिसेंबर- सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आहे. 'अतरंगी रे' (Atarani Re) या चित्रपटात ती बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार धनुषसोबत दिसणार आहे. 'चकाचक' चित्रपटातील पहिले गाणे लोकांकडून पसंत केले जात आहे.ज्यामध्ये सारा अली खानचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. लोकांकडून इतकं प्रेम मिळूनही साराकडून एक गडबड झाली. ज्यानंतर तिला काळजी वाटू लागली. मात्र नंतर सर्वकाही ठीक झाले. पण यादरम्यान साराच्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी कॅमेऱ्यात कैद झाली.
View this post on Instagram
साराचा फोन हरवला-
सारा अली खान नुकतीच मुंबईतील एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचली होती. यादरम्यान फोन कुठेतरी ठेवून ती विसरली. रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडताना तिला तिचा फोन आठवला, त्यानंतर ती पुन्हा रेकॉर्डिंग स्टुडिओकडे धावली. यावेळी साराच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आता या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'अरे माझा फोन हरवला'
व्हिडिओमध्ये, सारा अली खान तिच्या कारमधून बाहेर पडताना आणि नंतर स्टुडिओच्या आवारात परत पळताना दिसत आहे. सारा कारमधून बाहेर पडते आणि पापाराझीला सांगते, 'अरे, माझा फोन हरवला आहे. तुम्हाला फोटोचं लागलंय इथे माझा फोन हरवला आहे'. साराला अस्वस्थ पाहून पापाराझी तिला लवकरच सापडेल असा धीर देतो. मात्र, नंतर कळले की शेवटी तिचा फोन मिळाला आणि त्यानंतर ती परत तिच्या कारमध्ये गेली.
(हे वाचा:'ही कोणती चादर गुंडाळून आलीस'; अतरंगी ड्रेसमुळे उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल)
साराच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटातील 'चकाचक' हे गाणे रिलीज झाले आहे. सारा या गाण्याचे जबरदस्त प्रमोशन करत आहे. अलीकडेच मुंबईत एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सारा अली खान अनन्या पांडेसोबत 'चकाचक'वर डान्स करताना दिसली. तर याआधीही सारा गाण्याच्या प्रमोशनसाठी मुंबईतील एका कॉलेजमध्ये गेली होती.वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, 'अतरंगी रे' चित्रपटाव्यतिरिक्त, ती लवकरच 'द अमर अश्वत्थामा' आणि 'नखरेवाली'मध्ये दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sara ali khan