गणपतीसमोरच्या 'त्या' फोटोमुळे अजूनही ट्रोल होतेय सारा अली खान

गणपतीसमोरच्या 'त्या' फोटोमुळे अजूनही ट्रोल होतेय सारा अली खान

"तू मुस्लीम आहेस. तू तुझं नाव Sara ऐवजी Sara (swati) सरस्वती ठेवायला हवंस..."

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सिनेस्टारनी गणपतीबाप्पांबरोबरचे फोटो शेअऱ केले. स्टार मंडळींचा गणेशोत्सव कसा असतो, ते घरी गणपती बसवतात का, गणपतीची सजावट कशी करतात याविषयी उत्सुकता असते. त्यामुळे स्टार मंडळींच्या गणेशोत्सवाविषयी बातम्या येत असतात. गणेश चतुर्थीला तर अनेक सेलेब्रिटींनी स्वतःच त्यांचे बाप्पाबरोबरचे फोटो शेअर करत फॅन्सना शुभेच्छा दिल्या. सारा अली खाननेसुद्धा गणपतीबाप्पाची पूजा करतानाचा एक फोटो instagram वर शेअर केला. पण त्यानंतर साराला काही फॅन्सनी ट्रोल करायला सुरुवात केली. तू मुस्लीम आहेस. तू तुझं नाव सारा ऐवजी सरस्वती ठेवायला हवंस... अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.

VIDEO: सलमानच्या घरी कतरिनाने केली बाप्पांची आरती, लेझिमवर धरला दबंगने ताल

एका यूजरने तर सारा अली खानचा निषेध करत ती मुस्लीम असून हिंदू देवतेची पूजा करते म्हणून तिच्याविरोधात फतवा काढावा, असे अकलेचे तारे तोडले आहेत.

काही यूजर्सनी साराला तिचं नाव बदलण्याचा तर काहींनी धर्म बदलण्याचा सल्ला दिला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने वास्तविक पहिल्यांदाच असा फोटो शेअर केला आहे असं नाही.

घटस्फोटानंतर अमृतानं मागितले ‘इतके’ कोटी, सैफनं हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम

थायलंडमध्ये एका हिंदू मंदिरातला फोटोही तिने नुकताच शेअर केला होता. आई अमृता सिंग हिच्याबरोबर सारा तिथे गेली होती. तेव्हाही ईदच्या दिवशी सारा अली खान मंदिरात कशी जाते, अशी टीका तिच्यावर काही कडव्या मुस्लीम फॅन्सनी केली होती.

ईदच्या दिवशी सारा अली खान पोहोचली थायलंडच्या मंदिरात!

वास्तविक, सारा अली खान काही पहिली मुस्लीम अभिनेत्री नाही जिने हिंदू देवतेबरोबरचा फोटो शेअर केला आहे. सलमान खान, शाहरुख खान यांच्या घरच्या गणेशोत्सवाचे, दिवाळीचे फोटो नेहमीच शेअर होतात. त्यांचे फॅन्स त्याबद्दल कौतुकही करतात. पण साराच्या बाबतीत मात्र काही जण वेगळा न्याय देत आहेत.

----------------

VIDEO: शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 4, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या