Home /News /entertainment /

सारा अली खानचं करीनाच्या पावलावर पाऊल; बेबोच्या ड्रेसला केलं कॉपी, पाहा VIDEO

सारा अली खानचं करीनाच्या पावलावर पाऊल; बेबोच्या ड्रेसला केलं कॉपी, पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अलिकडेच एका ग्लॅमरस लुकमध्ये दिसली आहे. ज्यामध्ये ती करीनाच्या ड्रेसिंग स्टाईलची कॉपी (Sara Ali Khan copied kareena kapoors dress) करताना दिसली आहे.

  मुंबई, 14 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने (Sara Ali Khan) अलिकडच्या काही काळात इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. पण सध्या ती फॅन फॉलोव्हिंगच्या बाबतीत बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्र्यांना देखील मात देत आहे. सारा अली खान आणि तिची सावत्र आई करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांच्या दोघींचं खूप चांगलं जमतं. सारा बर्‍याच मुलाखतींमध्ये (Sara Ali Khan interview) तिच्या आणि करिनाच्या संबंधाबाबत उघडपणे बोलताना दिसली आहे. शिवाय ती सावत्र आई करीनाकडून करियरविषयी सल्लाही घेत असते. अलीकडेच सारा करीनाच्या ड्रेसिंग स्टाईलची कॉपी  (Sara Ali Khan copied kareena kapoors dress) करताना दिसली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतं आहे. सारा अली खान आज अतिशय स्टाईलिश आणि ग्लॅमरस कपड्यांमध्ये दिसली आहे. गोल्डन आणि लाल रंगाचा हा थाई स्लीड ड्रेस सारावर खूपच चांगला दिसत होता. शिवाय साराचे सँडलदेखील तिच्या या लुकमध्ये भर घालत होते. साराचा हा ड्रेस हुबेहुब करीना कपूरच्या ड्रेससारखाच आहे. करिनाने आपल्या ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटातील एका गाण्यात असाच ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे साराचा हा ड्रेस पाहून चाहत्यांना वाटतं आहे की, आता सारा करीनाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by yogen shah (@yogenshah_s)

  सारा अली खानने अलिकडेच करीना कपूरच्या 'वॉट वुमन वॉन्ट' या शोमध्ये आली होती. या कार्यक्रमात सारा अली खान आणि करीना कपूर यांनी आजकालच्या प्रेमाबाबत गप्पा मारल्या आहेत. 20 वर्षांपूर्वीच्या प्रेमात आणि आजकालच्या प्रेमात काय फरक आहे, यावरही त्यांनी चर्चा केली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीनाने सारा अली खानच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये ‘वन नाईट स्टँड’ बाबतही एक प्रश्न विचारण्यात आला होता. हे ही वाचा -ड्रेसिंग सेन्सवरून अनन्या पांडेला नेटकऱ्यांनी डिवचलं; चीअर लीडरशी केली तुलना यावेळी साराने सांगितलं की, ती 'वन नाईट स्टँड' सारख्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. यानंतर करिनानं विचारलं की, 'रिलेशनशिपमध्ये अशी कोणती गोष्ट आहे, जी तुला कधीच तडजोड करायला आवडणार नाही'. या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाली की, 'रिलेशनशिपमध्ये माझी फसवणूक झालेली मला कधीच आवडणार नाही. मी अशाच व्यक्तीला पसंत करेल, ज्याच्याविषयी मी अभिमानाने सांगू शकेल की, हा माझा आहे. ज्याच्याबाबत मी अभिमानानं म्हणू शकेल की, हा माझ्यासोबत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानेही असाच विचार करायला हवा, अन्यथा नात्याला काही अर्थ उरणार नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Kareena Kapoor, Sara ali khan

  पुढील बातम्या