मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विकी कौशलमुळं सारा अली खाननं स्वतः ला म्हटलं नशीबवान! काय आहे कारण?

विकी कौशलमुळं सारा अली खाननं स्वतः ला म्हटलं नशीबवान! काय आहे कारण?

अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुंबई, 16 डिसेंबर-  अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'केदारनाथ', 'सिम्बा', 'लव्ह आज कल' आणि 'कुली नंबर 1' या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या सारा तिच्या आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, सारा अली खान आणखी एक मोठा चित्रपट करणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) दिसणार आहे. या प्रतिभावान अभिनेत्यासोबत काम करणार असल्यानं सारा खूप खूश आहे.

साराच्या विकी कौशलसोबतच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर करणार आहेत. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. या संदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, साराला वाटतं की विकी हा सध्याच्या काळातील सर्वात साधा कलाकार आहे. आणि त्याच्यासोबत काम करणे हा तिच्यासाठी मोठा आनंद आहे. यासोबतच अभिनेत्री विकीची स्तुती करत म्हटलं की, विकी कोणत्याही व्यक्तिरेखेला स्वतःमध्ये अगदी सहजतेने उतरवतो. आणि तसेच त्याच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळेल अशी आशा अभिनेत्रीनं व्यक्त केली आहे.

तसेच सारा अली खान लक्ष्मण उतेकरसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. रिपोर्टनुसार, साराने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही कौतुक केलं आहे. अभिनेत्रीनं म्हटलं आहे की ती लक्ष्मणजींची खूप मोठी फॅन आहे आणि तिला त्यांचे 'लुका छुपी' आणि 'मिमी' चित्रपट आवडतात. 'मिमी' चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या लक्ष्मणचं सर्वांनीच कौतुक केलं आहे.

(हे वाचा:अविवाहित रश्मिकाच्या पासपोर्टवरील सरनेम पाहून चाहते चकित; कारण आलं समोर )

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशी घोषणा करण्यात आली होती की सारा अली खान आणि विकी कौशल एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. मात्र या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. परंतु सुरुवातीच्या वृत्तानुसार, त्याची कथा एका छोट्या शहरातील प्रेमकथेवर आधारित आहे. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, सारा आणि विकी लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. सध्या, विकी त्याच्या लग्नाचा आनंद घेत आहे. तर सारा तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २४ डिसेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सारासोबत अभिनेता धनुष आणि अक्षय कुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

First published:

Tags: Entertainment, Sara ali khan, Vicky kaushal