चाहत्याच्या आगाऊपणामुळे सारा अली खान घाबरली , नेमकं काय घडलं पाहा VIDEO

चाहत्याच्या आगाऊपणामुळे सारा अली खान घाबरली , नेमकं काय घडलं पाहा VIDEO

एका चाहत्याच्या कृतीमुळे सारा गोंधळली. सारासोबत त्या व्यक्तीने जे केलं त्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हाइरल झाल्याने चाहत्यांनीही व्यक्त केली नाराजी. चाहत्यांनी साराला बॉडीगार्ड सोबत ठेवण्याचा दिला सल्ला.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : अभिनेत्री सारा अली खान तिच्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. चाहत्यांना ती फोटोसाठी नाही म्हणत नाही. मात्र एका चाहत्याच्या कृतीमुळे सारा गोंधळली. सारासोबत त्या चाहत्याने जे केलं त्याचा VIDEO  इंस्टाग्राम वर शेअर झाला आहे. या VIDEO मध्ये ती नेहमीप्रमाणे जिम वरून परतत असताना दिसत आहे. फोटोग्राफर्सनी तीला फोटो काढण्यासाठी विनंती केली. फोटोग्राफर्सच्या विनंतीचा मान राखत साराही त्यांना फोटो काढू देत आहे. सारा या व्हिडीओमध्ये क्रॉप-टॉप मध्ये दिसत आहे. फोटो काढणारे फोटोग्राफर्स साराला तिची ख्याली खुशालीही विचारत आहे. फोटोग्राफर्सच्या प्रश्नाला साराही अगदी आनंदाने स्मित हास्य देत उत्तर देत आहे. हे सगळं सुरू असताना आणखी काही जण साराला त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करतात. काही तरुण सारासोबत फोटो काढत असताना त्याचवेळी एका व्यक्तीने साराशी हस्तांदोलन करण्याचीही इच्छा व्यक्त केली.

चाहत्याच्या वागण्याने सारा गोंधळली

सारा अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत अगदी मनमोकळा संवाद साधत असते. चाहत्यांना सेल्फी काढू देण्याबाबतही सारा आनंदी असते. मात्र इथे ज्या चाहत्याने साराशी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली त्याने थेट साराच्या हाताचं चुंबन घेतलं. त्या व्यक्तीच्या या कृतीतून सारा गोंधळून गेली आणि तिला नेमकं काय करावं हेच कळालं नाही. काही वेळासाठी सारा गोंधळून गेली. त्यानंतर लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितलं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर साराच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. साराच्या सरळ स्वभावाचा कुणी असा फायदा घेता कामा नये अशी प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली आहे.

त्या व्यक्तीच्या वागण्यावर चाहतेही नाराज

चाहत्यांनी आपल्या मर्यादा ओळखून वागलं पाहिजे. त्या व्यक्तीने जे केलं ते निंदनीय आहे. तर तिथेच काहींनी साराला बॉडीगार्ड ठेवण्याचा सल्लाही दिला आहे. एका चाहत्याने सारा विषयी बोलताना म्हटलं की सारा अगदी सर्वसामान्य लोकांप्रमाणे राहते. तिच्या सरळ स्वभावाचा चाहत्यांनीही तिच्याशी वागताना गैरफायदा घेता कामा नये. 'सारा तू तुझ्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकर उपाय कर', असा सल्लाही चाहते तीला देत आहेत.

---------------

अन्य बातम्या

सनई-चौघडे वाजणार! 'या' खास व्यक्तीमुळे कंगनानं सुरू केली लग्नाची तयारी

नेहा कक्कर पुन्हा प्रेमात, Indian Idolच्या सेटवर उदित नारायणनची सुनेला पसंती

लग्नानंतरच्या बॅड पॅचबद्दल बोलली काजोल; सांगितलं वैयक्तिक आयुष्यातलं दुःख

Published by: Manoj Khandekar
First published: January 10, 2020, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading