सारा अली खानसोबत ब्रेकअप; करिनाशी फ्लर्ट करताना दिसला कर्तिक आर्यन, पाहा VIDEO

सारा अली खानसोबत ब्रेकअप; करिनाशी फ्लर्ट करताना दिसला कर्तिक आर्यन, पाहा VIDEO

कार्तिकचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो करिना कपूरसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. याआधी सगळीकडे एकत्र दिसणारे कार्तिक आणि सारा आता एकमेकांच्या समोर येणंही टाळताना दिसतात. मागच्या काही दिवसांपासून कार्तिक आणि अनन्या पांडे यांच्यात जवळीक वाढल्याचं दिसत आहे. पण आता कार्तिकचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो करिना कपूरसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.

कार्तिक आर्यननं नुकतीच करिना कपूरचा रेडिओ शो ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’मध्ये हजेरी लावली. यावेळी तो रिलेशनशिप या विषयावर बोलला. दरम्यान या शोमध्ये करिना कपूरनं कार्तिकला काही प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न असा होता. कपल गोल्ससाठी कोणती जोडी तुझ्या मते बेस्ट आहे. त्यावर कार्तिक सैफ-करिनाचं नाव घेतो मात्र करिना त्याला असं न करण्याविषयी सांगते. त्यानंतर कार्तिक काही विचार करतो आणि तिला विचारतो, ‘पण तु लग्न का केलं’ यावर करिना लाजते आणि मग म्हणते की, ‘कार्तिक खूप बदमाश आहे.’

'छपाक' ट्रेलर रिलीजनंतर नाराज आहे लक्ष्मी अग्रवाल?

करिना कपूरच्या शोच्या या सीझनमध्ये कार्तिक आर्यन तिचा दुसरा गेस्ट आहे. या आधी करिनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी तिच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी तिला बरेच सल्ले दिले आणि प्रेक्षकांशी आपले वेगवेगळे अनुभवही शेअर केले. सारा अली खान ही सैफ अली खानची मुलगी आहे तर करिना सैफची दुसरी पत्नी आहे. नात्यानं ती साराची सावत्र आई आहे. त्यामुळे कार्तिकनं तिच्यासोबत असं फ्लर्ट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

...म्हणून 'छपाक'च्या सेटवर पहिल्याच दिवशी दीपिकाला कोसळलं होतं रडू

अनिल कपूरच्या हॅन्डसम आणि आनंदी दिसण्याचं 'हे' आहे गुपित!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या