मुंबई 17 जुलै: सारा अली खान (Sara Ali Khan) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते. (Sara Ali Khan video viral) यावेळी ती आपल्या इमोजी व्हिडीओमुळे चर्चेत आहे. आज जागतिक इमोजी दिवस आहे. (World Emoji Day) या निमित्ताने तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने सबंध सोशल मीडिया वापरकर्त्यांना इमोजी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
साराने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विविध इमोजींच्या हावभावाची नक्कल करताना दिसत आहे. हा विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत तिला देखील इमोजी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
20 वर्षानंतर सीरिअल किलर फासावर; 47 वार करून केली होती अभिनेत्रीची हत्या
View this post on Instagram
मुनमुन दत्तानं केली चिखलानं अंघोळ; ‘मडबाथ’मुळे उडवली जातेय खिल्ली
जर्मी बर्ग यांनी 17 जुलै 2014 रोजी इमोजीपिडियाची सुरुवात केली. त्यानंतर विविध ठिकाणी या इमोजींचा वापर सुरु झाला. मात्र हा दिवस इमोजीच्या वापरानंतर एक वर्षाने साजरा करण्यास सुरुवात झाली. सध्या एकूण 2800 इमोजी आहेत. त्यातील 2300 इमोजी फेसबुकवर रोज वापरल्या जात असल्याचे या आकडेवारीवरुन समोर आले आहे. तर फेसबुक मेसेंजरवरुन रोज 90 कोटींहून जास्त इमोजी एका दिवसांत पाठवल्या जातात. यातही कोणत्या देशात कोणती इमोजी जास्त वापरली जाते याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जोरात हसण्याची इमोजी अमेरिका, युके, थायलंड, फिलिपिन्स, मेक्सिको, इंडोनेशिया या देशांमध्ये वापरली जाते. तर केकची इमोजी भारताबरोबर स्विडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जर्मनीत सर्वाधिक वापरली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sara ali khan, Video viral