मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: सारा अली खानलाही गोविंदाच्या गाण्याची भुरळ; जिममध्ये ते गाणं लागताच केला भन्नाट डान्स

VIDEO: सारा अली खानलाही गोविंदाच्या गाण्याची भुरळ; जिममध्ये ते गाणं लागताच केला भन्नाट डान्स

सारा अली खान (Sara Ali Khan) चक्क गोविंदाच्या (Govinda) गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. ओरिजनल कुली नंबर वन चित्रपटातील हे गाणं आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. तिच्या फिटनेसच्या बाबतीतही ती अतिशय जागरुक आहे. सारा अली खान बर्‍याचदा तिच्या वर्कआउटचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अभिनेत्रीने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यामध्ये ती जिम ट्रेनरसोबत नाचताना दिसत आहे. सारा अली खानने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. सारा चक्क गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 'जेठ की दोहरी मे' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
  नुकतीच सारा अली खानने बॉलिवूडमध्ये 2 वर्षे पूर्ण केली. सारा अली खानने 2018 मध्ये 'केदारनाथ' चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या चित्रपटात सारा आणि सुशांतची जोडी लोकांना चांगलीच पसंत पडली. साराचे नवे प्रोजेक्ट? वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय 'कुली नंबर 1' या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसणार आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा लव्ह आजकल हा सिनेमाही तितकाच गाजला होता.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Sara ali khan

  पुढील बातम्या