मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूडमध्ये एण्ट्री करताच सारा अली खानने लोकांच्या मनात घर केलं. सिनेसृष्टीमध्ये साराचं अभिनयापासून ते डान्सपर्यंत कौतुक केलं जातं आहे. सारा अली खानच्या डान्सची सर्वत्र चर्चा आहे. आता साराच्या डन्सचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
अभिनेत्री सारा अली खानने या व्हिडिओमध्ये सुंदररित्या डान्स केला आहे. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या फॅन्सना फार आवडत आहे. साराने दिव्या भारतीचं सुपरहिट गाणं 'सात समंदर पार में तेरे पिछे पिछे आ गई...' यावर अप्रतिम डान्स केला आहे.
अभिनेत्री सारा अली खान या आधीसुद्धा याच गाण्यावर थिरकली होती. फॅशन डिझाइनर अबू जानी संदीप खोसलाच्या भाचीच्या लग्नात साराने याच गाण्यावर डान्स केला होता. 'सात समंदर...' या गाण्यावर परफॉर्म करताना साराने साडी नेसली होती. ज्यात ती फारच सुंदर दिसत होती.