कार्तिक आर्यनसोबत ब्रेकअपनंतर सारानं एक्स बॉयफ्रेंडसोबत साजरी केली दिवाळी!

सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण नुकतंच त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 11:17 AM IST

कार्तिक आर्यनसोबत ब्रेकअपनंतर सारानं एक्स बॉयफ्रेंडसोबत साजरी केली दिवाळी!

मुंबई, 31 ऑक्टोबर : अभिनेत्री सारा अली खानन आतापर्यंत बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही तिचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. पण अनेकदा आपल्या सिनेमामुळे नाही तर पर्सनल लाइफमुळे सारा सगळीकडे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सारा तिच्या फॅमिलीसोबत दिवाळी सेलिब्रेशन करतना दिसली होती. मात्र आता ती दिवाळा सेलिब्रेशनच्या वेळी एक्स बॉयफ्रेंड वीर पहारियासोबत होती अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी दिलेल्या दिवाळी पार्टीमध्ये सारा अली खान तिचा एक्स बॉयफ्रेंड वीर पहारिया सोबत दिसली या पार्टीमध्ये हे दोघंही बराच वेळ एकमेकांशी बोलताना दिसले. यावेळी ते दोघंही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर सारानं वीरसोबत डान्स सुद्धा केला.

रिअल हिरो! ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव वाचवणाऱ्या शाहरुखचं सलमाननं असं केलं कौतुक

Loading...

 

View this post on Instagram

 

दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

इंग्रजी वेबसाइट इंडिया टुडेनं प्रिसद्ध केलेल्या वृत्तानुसार सारा अली खानने बॉलिवूड पदार्पणाच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत एक्स बॉयफ्रेंड वीर पहारिया व्यतिरिक्त कोणालाच डेट न केल्याचं म्हटलं होतं. साराचा एक्स बॉयफ्रेंड वीर हा देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.

KBC 11 : अमिताभ बच्चन यांना सनबाथ घेताना पाहण्यासाठी फॅनची अजब युक्ती!

या मुलाखती दरम्यान सारा म्हणाली, वीर पहाडिया हा एकमेव व्यक्ती आहे ज्याला मी डेट केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाला ही डेट केलेलं नाही. वीर बद्दल बोलताना सारा म्हणाली, आमच्या नात्यात कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. वीरनं मला कधीच दुखावलं नाही. एका चागल्या वळणावर आम्ही दोघांनीही एकमेकांच्या संमतीनं हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

सारानं 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. या सिनेमात तिनं अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर केली होती. याआधी 2016 मध्ये ती वीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र एका वर्षानंतर हे दोघं वेगळे झाले. रिलेशनशिपमध्ये असताना वीरनं साराला एक अंगठी भेट म्हणून दिली होती.

 

View this post on Instagram

 

It's a WRAP!! 66 days & a million memories ❤️ Thank you @imtiazaliofficial for making my dream come true I truly appreciate your warmth, patience and consideration with me every single day. Being on your set has been a privilege that I will always cherish and already miss Thank you @kartikaaryan for instantly making me comfortable with you, for selflessly giving and for consistently looking out for me. From coffee’s about you to chai’s with you, I wish we could do it all over again ☕️ I’m going to miss you more than you know and more than I can admit ‍♀️ Imtiaz Ali’s next with @kartikaaryan and @randeephooda. ‬ ‪Releasing on 14th Feb 2020. Presented by @officialjiocinema , #DineshVijan’s @maddockfilms , @imtiazaliofficial & @reliance.entertainment @wearewsf

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

मागच्या काही दिवसांपासून सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान मध्यंतरीच्या काळात हे दोघं अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसले होते. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. कार्तिक आर्यननं फोटोग्राफर्सना सारासोबत फोटो क्लिक करण्या मनाई केली आहे तसेच मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका असंही त्यानं पॅपराजीला सांगितल्याचं बोललं जात आहे. लवकरच सारा आणि कार्तिक इम्तियाज अली यांच्या 'लव्ह आजकल 2' मध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेला रिलीज होणार असल्याची माहिती मिळते.

घटस्फोटानंतरही आनंदात जीवन जगत आहेत बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री

======================================================================

VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...