लेकीनं करीनाला Aunty म्हणताच भडकला सैफ; साराला ऐकावी लागली बोलणी

लेकीनं करीनाला Aunty म्हणताच भडकला सैफ; साराला ऐकावी लागली बोलणी

सारा अली खानने (Sara Ali Khan) करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिच्या नात्याच्या सुरुवातीला घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैल अली खानचं (Saif Ali Khan) लग्न झाल्यावर सारा अली खानला  (Sara Ali Khan) प्रश्न पडला होता की तिने करीनाला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी? करीना कपूर आणि साराचा संबंध आता अतिशय चांगले आहेत. पण करीनाचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा ती आपल्याशी कसं वागेल असा साराला प्रश्न पडला होता. सैफ आणि करीनाच्या लग्नानंतर घडलेला एक भन्नाट किस्सा सारा अली खानने एका टॉक शोमध्ये सांगितला आहे.

सावत्र आई नाही मैत्रीण

करीना तिच्या सारा आणि तिच्या भावाशी एखाद्या मैत्रिणीसारखं वागते. त्यांच्याशी सगळ्या विषयावर चर्चा करते. पण सुरूवातीला साराच्या मनात करीनाविषयी साशंकता होती. करीना एवढी मोठी सुपरस्टार असल्यामुळे ती आपल्याशी नीट वागेल का असा प्रश्न तिला पडायचा. पण करीनाने कधीच तिचं स्टारडम मध्ये आणलं नाही. असं सारा सांगते.

करीना लग्न होऊन घरी आल्यावर तिला काय हाक मारायची असा प्रश्न तिला पडला होता. करीनाला बेबो म्हणावं असं तिला वाटत होतं. त्यानंतर आँटी म्हणावं का असा प्रश्न तिला पडला. शेवटी तिने सैफलाच हा प्रश्न विचारला. तिचा हा प्रश्न ऐकून सैफ अली खान चांगलाच भडकला. सैफ म्हणाला, ‘आँटी कोणाला म्हणतेस? करीनाला आँटी म्हटलं तर ते तिला अजिबात आवडणार नाही. तिला आँटी सोडून अजून काहीही म्हण.’ सारालाही सैफचं म्हणणं पटलं आता सारा अली खान तिला ‘के’ या नावाने हाक मारते. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सारा अली खानचा कुली नंबर 1 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 30, 2020, 5:47 PM IST

ताज्या बातम्या