‘लव्ह आज कल’नंतर सारा करतेय डबल डेट, 28 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत करणार रील लाइफ रोमान्स

‘लव्ह आज कल’नंतर सारा करतेय डबल डेट, 28 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत करणार रील लाइफ रोमान्स

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला साराचा 'लव्ह आज कल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नसला तरीही सध्या तिच्याकडे नव्या सिनेमांची रांग लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : सारा अली खान सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ठरत आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला साराचा 'लव्ह आज कल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नसला तरीही सध्या तिच्याकडे नव्या सिनेमांची रांग लागली आहे. लवकरच ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आनंद एक राय यांचा 'अतरंगी रे' हा सिनेमा सुद्धा आहे. या सिनेमातबाबत आता सविस्तर माहिती मिळाली आहे.

आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' मध्ये अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुरुवातीला अक्षय कुमार या सिनेमात पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. तसेच ही कथा दोन वेगवेगळ्या धर्माच्या कपलची असून सारा आणि धनुष रोमन्स करताना दिसणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण दिग्दर्शक आनंद एल राय यांनी यावर मौन सोडत अक्षयची सिनेमात प्रमुख भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता नव्यानं मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान या सिनेमात डबल रोलमध्ये दिसणार आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

साराचा डबल रोल

नव्या माहितीनुसार सारा अली खान या सिनेमात डबल रोलमध्ये दिसणार आहे. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, सारा अली खान या सिनेमात डबल रोलमध्ये आहे आणि ती अक्षय आणि धनुष दोघांसोबतही वेगवेगळ्या पीढीतील रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमात सारा एका बिहारी मुलीची भूमिका साकारणार आहे. तर धनुष एका साउथ इंडियन मुलाची भूमिका साकारत आहे. या दोघांची क्रॉस कल्चर लव्हस्टोरी दाखवली जाणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार सोबत रोमान्स करणार आहे.

‘उद्या माझे ड्रायव्हर-मेकअपमन पण अवॉर्ड देतील’ सलमाननं सांगितलं बॉलिवूडचं सत्य

अक्षयचा स्पेशल लुक

मुंबई मिररच्या वृत्तात हे सुद्धा सांगण्यात आलं आहे की या सिनेमात प्रत्येक अभिनेत्याचा लुक स्पेशल असणार आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणेच त्याचे लुक सुद्धा अतरंगी असणार आहेत. याशिवाय अक्षय कुमारचा लुक खास असणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात साराचा डबल रोल असणार आहे. अक्षय धनुष यांच्या स्वतःची वेगळी झलक तर असेलच पण खास आकर्षण आहे ते अक्षय-साराच्या ऑनस्क्रीन रोमान्सचं कारण सारा अली खान स्वतःहून 28 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

मलायकाशी घटस्फोटावर अरबाज म्हणतो, आमच्यात सर्वकाही ठिक होतं पण...

First published: February 20, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या