कार्तिक आर्यनशी लिंकअपच्या चर्चांमुळे साराच्या कुटुंबातली 'ही' व्यक्ती आहे नाराज

कार्तिक आणि सारा लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल'च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 09:42 AM IST

कार्तिक आर्यनशी लिंकअपच्या चर्चांमुळे साराच्या कुटुंबातली 'ही' व्यक्ती आहे नाराज

मुंबई, 08 जून : पतौडी प्रिन्सेस सारा अली खाननं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे अभिनेता कार्तिक आर्यनबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. टीव्ही शो 'कॉफी विथ करण'मध्ये सारानं पहिल्यांदा कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना डे आउटला जातानाही स्पॉट केलं गेलं होतं. तसेच ईदच्या दिवशी सुद्धा कार्तिक आणि सारा चेहरा झाकून मुंबईच्या रस्त्यांवर एंजॉय करताना दिसले. पण कार्तिक आणि साराच्या या वाढत्या जवळीकतेमुळे साराची आई अमृता सिंह मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे.
डीएनए रिपोर्टनुसार, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यातील जवळीक वाढल्यानं साराची आई अमृता नाराज आहेत. सारा तिच्या प्रोफेशन लाइफपेक्षा तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत येत आहे आणि यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफवर परिणाम होत आहे. असं सारच्य आईला वाटतं. कार्तिक सोबतच्या लिंकअपच्या चर्चामुळे ती सतत चर्चेत आहे. त्यामुळे अमृता सिंह नाराज असून त्यांनी साराला आपल्या कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

VIRAL VIDEO : चाहत्याच्या 'त्या' कृतीमुळे रणबीर कपूर होतोय ट्रोल
साराच्या वडिलांबाबत याविषय बोलायचं झाल्यास सैफ अली खानला कार्तिकशी साराच्या नात्याविषयी काहीही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे सैफ निश्चित आहे. कार्तिकच्या करिअरचा ग्राफ सतत वर जात आहे आणि त्यानं साराबाबत अद्याप तरी कोणतही नकारात्मक विधान केलेलं नाही. कार्तिकच्या कमी बजेटच्या सर्वच सिनेमांनी खूप चांगली कमाई केली आहे.

ग्लॅमर सोडून आता प्रियांका चोप्रा करणार शेती? निकनं केला 'हा' खुलासाView this post on Instagram
 

Eid Mubarak ✨


A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

कार्तिक आणि सारा लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल'च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेंटाइन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कार्तिक एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या वयातील भूमिका साकारताना दिसणार आहे. साराने तिच्या पदार्पणाच्या 'केदारनाथ' सिनेमातच बाजी मारली असून त्यानंतर आलेला तिचा 'सिंबा' हा सिनेमाही खूप गाजला. या सिनेमात ती रणवीर सिंग सोबत दिसली होती.

प्रभाससाठी काहीपण! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी जपानी चाहत्यांनी केली चक्क भारत वारी

SPECIAL REPORT : मुंबई विमानतळावर तुमच्या बॅगेतून सामनाची चोरी? हे आहे VIRAL VIDEO चं सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close