'लव्ह आजकल'चा सीक्वेल : सारा आणि कार्तिकचा आगामी सिनेमा 'या' खास दिवशी होणार रिलीज

'लव्ह आजकल'चा सीक्वेल  : सारा आणि कार्तिकचा आगामी सिनेमा 'या' खास दिवशी होणार रिलीज

सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा सुपरहिट सिनेमा 'लव्ह आजकल'चा सिक्वेल असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मागच्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहेत. सध्या हे दोघंही इम्तियाज अली यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा सिनेमा सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा सुपरहिट सिनेमा 'लव्ह आजकल'चा सिक्वेल असल्याचं म्हटलं जात आहे. घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही आता ठरली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 'व्हॅलेंटाइन डे'ला प्रदर्शित होणार आहे. मॅड्डॉक फिल्मच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहीती दिली. पण अद्याप या सिनेमाच्या नावाबाबत कोणतीच माहीती मिळालेली नाही. या सिनेमात कार्तिक आणि सारा व्यतिरिक्त रणदीप हुडाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या सिनेमाचं बहुतांश शूटिंग हे दिल्लीमध्ये झालं असून या सिनेमातील सारा आणि कार्तिकचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे ज्यात कार्तिक-सारा बाइक राइड एंजॉय करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीजन-6'मध्ये सारानं सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिनं कार्तिक आर्यनला डेट करायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर रणवीर सिंगने एका पार्टीमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. कार्तिक आणि साराची लोकप्रियता पाहिल्यावर इम्तियाज अली यांनी आपली आगामी सिनेमात त्यांना कास्ट केलं.

या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर कार्तिक आणि साराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये कार्तिक-सारा लिपलॉक किस करताना दिसले. त्यामुळे हा सीन लव्ह आज कल या सिनेमातील असल्याचा अंदाज लावला जात होता. कार्तिकच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'लुका छिपी'नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर साराचे 'केदारनाथ' आणि 'सिंबा' हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले.

VIDEO: अशी धुळवड तर तुम्ही कधीच खेळली नसेल !

First published: March 21, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading