कार्तिक आर्यनसोबत बाइकवर सारा अली खान, व्हिडिओमुळे झाली ट्रोल

कार्तिक आर्यनसोबत बाइकवर सारा अली खान, व्हिडिओमुळे झाली ट्रोल

ही जोडी रिलेशनशिपमध्ये असण्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनी एकमेकांचं नाव घेतलं.

  • Share this:

नवी दिल्ली, १९ मार्च- सारा अली खानने गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तिने दोन सिनेमांत काम केलं. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. सध्या ती लव्ह आज कल २ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे.

दरदिवशी या सिनेमाच्या सेटवरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात कार्तिक दिल्लीतील रस्त्यांवर बाइक चालवताना दिसत आहे. बाइकवर मागे सारा बसलेली दिसत आहे. पण तिने हॅल्मेट घातलेलं नाही. याच कारणामुळे ती ट्रोल होत आहे.

 

View this post on Instagram

 

#saraalikhan and #kartikaaryan snapped in delhi ❤️

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

व्हिडिओमध्ये सारा आणि कार्तिक एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. कार्तिक तिला काही सांगताना दिसत आहे तर त्यावर सारा हसतही आहे. साराने ओवरकोट घातला होता तर कार्तिकने निळ्या रंगाचं शर्ट घातलं आहे. या व्हिडिओला कोणी पीआर स्टंटशी जोडलं तर कोणी हेल्मेट न घातल्यामुळे साराला सुनावले. तसेच सारा समाजाला चुकीचा संदेश देत असल्याचंही काहींनी म्हटलं.

 

View this post on Instagram

 

First, think. Second, dream. Third, believe. and Finally, dare. -Walt Disney ‍♀️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

ही जोडी रिलेशनशिपमध्ये असण्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनी एकमेकांचं नाव घेतलं. आता दोघं एकाच सिनेमात काम करत आहेत म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळून आहेत. साराने सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर रणवीर सिंगच्या सिंबा सिनेमातही ती दिसली होती.

VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

First published: March 19, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading