Home /News /entertainment /

‘लव्ह आज कल’ रिलीजआधीच सारा-कार्तिकचे पर्सनल रोमँटिक चॅट झाले लीक

‘लव्ह आज कल’ रिलीजआधीच सारा-कार्तिकचे पर्सनल रोमँटिक चॅट झाले लीक

या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. पण त्याआधी सारा-कार्तिकचे पर्सनल रोमँटिक चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 23 जानेवारी : अभिनेत्री सारा अली खान खान आणि कार्तिक आर्यन यांचा ‘लव्ह आज कल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्सिनेमातील सारा-कार्तिकच्या केमिस्ट्री सगळीकडे चर्चा आहे. हा सिनेमा 2009 मध्ये आलेल्या सैफ आणि दीपिकाच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण त्याआधी सारा आणि कार्तिकचे पर्सनल रोमँटिक चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘लव्ह आज कल’चं शायद हे गाणं नुकतंच रिलीज पण त्याआधी सारा आणि कार्तिकचे पर्सनल चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात कार्तिक आर्यन साराला ‘मी तुझा विचार करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही.’ असं सांगतो. त्यावर सारा त्याला, ‘मी सुद्धा तुझाच विचार करत आहे.’ असं सांगते. सारा हे चॅट त्यांच्या गाण्याच्या प्रमोशनचा एक फंडा आहेत. ज्यात हे दोघंही वीर आणि जोई म्हणून एकमेकांशी चॅट करत आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एकमेकांना डेट करत होते. त्यांची जोडी अल्पवधीतच बॉलिवूडमध्ये हिट झाली होती. पण नंतर दोघांमध्ये दुरावा आला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा थोडा हिरमोड झालेला पाहयला मिळाला मलायका अरोराच्या नव्या योगा पोझचा इंटरनेटवर धुमाकूळ, पाहा Latest Photo
  सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण दरम्यानच्या काळात या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं आहे. पण तरीही आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघंही मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. कंगनाने टीम इंडियातल्या 'या' क्रिकेटपटूला म्हटलं पंगेबाज
  या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 2009 मध्ये दीपिका आणि सैफच्या लव्ह आज कलचा सिक्वेल आहे. दरम्यान लेकीच्या या सिनेमाच्या ट्रेलरवर सैफनं फारशी चांगली प्रतिक्रिया दिली नव्हती. मुलीच्या सिनेमापेक्षा आपलाच सिनेमा जास्त चांगला असल्याचं सैफनं म्हटलं होतं. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये अद्याप उत्सुकता कायम आहे. हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हेलेंटाइन डे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. कशी आहे शबाना आझमींची प्रकृती, कुटुंबीयांनी केला खुलासा
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kartik aryan, Sara ali khan

  पुढील बातम्या