लम्बी जुदाई! कार्तिकपासूनचा दुरावा सहन होईना, साराच्या 'या' कृत्यानं चाहते अवाक

लम्बी जुदाई! कार्तिकपासूनचा दुरावा सहन होईना, साराच्या 'या' कृत्यानं चाहते अवाक

सारा आणि कार्तिकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : निर्माता करण जोहरच्य चॅट शोमध्ये अभिनेत्री सारा अली खाननं कार्तिक आर्यन आवडत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर एका अवॉर्ड नाइटमध्ये रणवीर सिंहनं या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या ना त्या कारणानं सारा आणि कार्तिकचं नाव चर्चेत राहिलं. याशिवाय दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी त्याच्या आगामी सिनेमासाठी सारा कार्तिकला साइन केलं आणि याच्यातील जवळीक वाढत असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. ज्यात कार्तिक आणि सारा मध्ये स्पेशल बॉन्डिंग दिसून आलं. या सिनेमाचं शूट काही दिवसांपूर्वीच संपलं असलं तरीही कार्ति आणि सारा मात्र अद्याप एकत्र फिरताना दिसतात.

Bigg Boss Marathi : अजबच! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वधू वर सूचक मंडळ

सारा आणि कार्तिकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यावरून या दोघांमध्ये जवळीक जास्तच वाढलेली दिसत आहे. हा व्हिडिओ लखनऊ मधला असून यात सारा आणि कार्तिक एकमेकांचा हात पकडून उभे असलेले दिसत आहेत. सध्या कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे त्याचा आगामी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगसाठी लखनऊमध्ये आहेत. मात्र साराला कार्तिकचा दुरावा सहन झाला नाही आणि ती सुद्धा कार्तिकला भेटायला लखनऊला पोहचली. साराच्या या कृतीमुळे तिचे चाहतेही अवाक झाले आहेत. त्यावेळचा त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

फरहान अख्तरनं पुन्हा शेअर केला गर्लफ्रेंड शिबानीसोबतचा स्वीमिंग पूलमधला HOT फोटो

View this post on Instagram

#saraalikhan all support for #kartikaaryan who is currently shooting in lucknow. ❤❤❤❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

खरं तर अशाप्रकारे सारा कार्तिकची एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही शुटिंग दरम्यान या दोघांचे एकमेकांशी मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी कार्तिक साराला गर्दीमध्ये प्रोटक्ट करताना दिसला होता. साराचे बॉडीगार्ड सोबत असतानाही कार्तिक तिची काळजी घेताना दिसला होता. त्यांचा हा व्हिडो सोशल मीडियावर खूप व्हायरल होता. ज्या प्रकारे कार्तिक साराची नेहमी काळजी करताना दिसतो त्यावरुन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू आहेत.

9 महिन्यानंतर अर्जुननं काढली टोपी, खूश झालेल्या मलायकानं केली 'ही' कमेंट

वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर कार्तिक आणि सारा इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ मध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

================================================================

महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहूबाजुंनी पाण्याचा वेढा, डब्यात पाणी शिरल्यानं प्रवाशांमध्ये भीती, पाहा LIVE VIDEO

Published by: Megha Jethe
First published: July 27, 2019, 10:45 AM IST

ताज्या बातम्या