VIDEO : प्रेम की दुरावा? सावत्र आई करिना कपूरसोबत कसं आहे साराचं नातं

VIDEO : प्रेम की दुरावा? सावत्र आई करिना कपूरसोबत कसं आहे साराचं नातं

सारा अली खान आणि तिची सावत्र आई अभिनेत्री करिना कपूर यांच्यात नक्की नातं कसं आहे याविषयी फारसं कोणाला माहित नाही.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि तिची सावत्र आई अभिनेत्री करिना कपूर यांच्यात नक्की नातं कसं आहे याविषयी फारसं कोणाला माहित नाही. साराची आई अमृता सिंहपासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खाननं 2012 मध्ये करिना कपूरशी लग्न केलं. त्यामुळे सारा आणि इब्राहिम यांचं करिनाशी असलेलं नातं हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला. नुकताच सारा आणि करिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात या दोघांमधील नातं नेमकं कसं आहे हे पाहायला मिळालं.

सारानं नुकतीच करिना कपूरचा रेडिओ शो व्हॉट विमेन वॉन्टमध्ये हजेरी लावली. या शोच्या शूटिंगनंतर सारा आणि करिना एकत्रच बाहेर पडले. त्यावेळचा त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. शूटिंग संपवून बाहेर पडल्यावर सारा आणि करिनानं एकमेकींची गळाभेट घेत निरोप दिला. त्यांच्या या व्हिडीओवर सध्या सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट पाहायला मिळत आहेत.

कॅलेंडवर चालतं 'या' अभिनेत्रीचं आयुष्य, वर्षातून फक्त 12 वेळाच होते पतीची भेट

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सेलिब्रेटी पेज या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सारा चेक्स शर्ट आणि शिमरी शॉर्ट स्कर्टमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तर दुसरीकडे कारिना कपूर पिंक कलरच्या आउटफिट्समध्ये सुंदर दिसत आहे.

रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांका झाली ट्रोल, आई मधू चोप्रां टीकाकारांना म्हटलं...

 

View this post on Instagram

 

Wishing you very good luck for your upcoming movie @saraalikhan95 ❤️ #whatwomenwantseason2 @dotheishqbaby

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बी टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी सारा-कार्तिक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर करिना कपूर लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चढ्ढा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

व्हिडीओ कॉलवर होती दीपिका, को-स्टारनं रणवीर सिंहला केलं KISS

First published: February 1, 2020, 1:02 PM IST

ताज्या बातम्या