मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बी-टाऊन बेस्टीज बनणार को-स्टार'; सारा खाननं पोस्ट शेअर करत केला खुलासा

'बी-टाऊन बेस्टीज बनणार को-स्टार'; सारा खाननं पोस्ट शेअर करत केला खुलासा

 बी-टाऊन बेस्टीज अशी ओळख असलेल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सारा अली खान आणि जान्हवी कपूर (Sara ali Khan And Janhavi Kapoor). दोघी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

  मुंबई, 19 ऑगस्ट : बी-टाऊन बेस्टीज अशी ओळख असलेल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सारा अली खान आणि जान्हवी कपूर (Sara ali Khan And Janhavi Kapoor). दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी असून नुकतीच त्यांनी 'कॉफी विथ करण' सीझन 7 मध्ये सोबत हजेरी लावली होती. 'कॉफी विथ करण' च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दोघी झळकल्या होत्या. यावेळी त्यांचं बॉन्डिंग दिसून आलं. अशातच दोघी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. याविषयी अभिनेत्री सारा अली खाननं पोस्ट शेअर माहिती दिली आहे. त्यामुळे दोघींचे चाहते खूपच उत्साही असल्याचं पहायला मिळतंय. 'कॉफी विथ करण' सीझन 7 मध्ये सारा आणि जान्हवीनं दोघींमधील बॉन्डिग दाखवून दिलं. तेव्हापासून बॉलिवूडमधील बेस्टफ्रेंड जोडीमध्ये त्यांची गणना होतेय. ही बेस्टीजची जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र येण्यासाठी सज्ज झाल्याचं पहायला मिळतंय. सारा अली खाननं जान्हवीसोबत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सारा आणि जान्हवी खूप घाबरलेल्या दिसत आहेत. या फोटोसोबत सारानं लिहिलं की, एकत्र कॉफी पिल्यानंतर आता दोघेही को-स्टार म्हणून शूटिंग करणार आहे. पुढे सारा म्हणाली की, थोडी प्रतिक्षा करा आणि मग तुम्हाला याविषयी सांगू. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. त्यामुळे दोघी नक्की कशाचं शूट एकत्र करणार आहे याविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
  दोघेही करण जोहरच्या शो कॉफी विथ करण 7 मध्ये एकत्र दिसल्या होत्या आणि यावेळी त्यांनी त्यांच्या बाँडिंग आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही उघड केले. तसेच त्यांच्या ट्रिपविषयीही सांगितलं. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती दोघांच्या लव्ह लाईफची. गेल्या काही काळापासून सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या मैत्रीची बरीच चर्चा होत आहे. आता दोघीही एकत्र स्क्रीन शेअर करणार म्हटल्यावर धमाका तर होणारच. मात्र हा धमाका नक्की काय असणार याची उत्सुकता वाढलीये. याविषयी कधी खुलासा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Janhavi kapoor, Sara ali khan

  पुढील बातम्या