Home /News /entertainment /

अभिनेता गश्मीर महाजनीचा त्याच्या स्टुडन्ट्सबरोबर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

अभिनेता गश्मीर महाजनीचा त्याच्या स्टुडन्ट्सबरोबर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक असलेल्या गश्मीरने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वतःची डान्स अकादमी सुरु केली. तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर आणि स्टाफबरोबर गश्मीरचं खास नात आहे. त्यांच्याबरोबर बऱ्याच दिवसांनी गश्मीरनं वेळ घालवून भन्नाट डान्स केला,

पुढे वाचा ...
  मुंबई, 06 जुलै:  अभिनेता गश्मीर महाजनी ( Gashmeer Mahajani)  त्याच्या किलर लुक्स आणि दमदार अभिनयाने  चाहत्यांची मन नेहमीच  जिंकतो. पण आता तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत  आलाय आणि  ते कारण म्हणजे त्याचा भन्नाट डान्स. नुकताच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या डान्सचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे गश्मीर हा डान्स त्याच्या डान्स अकादमीतील विद्यार्थी आणि इतर स्टाफ यांच्याबरोबर डान्स करत आहे. ( Gashmeer Mahajani Dance Video) इंस्टाग्रामवर सध्या ट्रेंडिंग चालू असलेल्या गाण्यावर गश्मीरने हा डान्स केला आहे. त्याच्या या डान्सवर तर चाहते फिदा झाले आहेत. त्याच्या  चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद देत त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक असलेल्या गश्मीरने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वतःची डान्स अकादमी सुरु केली. 'GRM  डान्स स्टुडिओ' असं या इस्टिट्यूटच नाव आहे. या इस्टिट्यूटच्या स्थापनेबाबत गश्मीरने एका मुलाखतीत सांगितले होते कि, 'मला डान्स करायला  पहिल्यापासूनच आवडायचा. पण मी त्याकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलं नव्हतं. पण आमच्या घरावर आलेल्या आर्थिक संकटामुळे मला पंधराव्या वर्षीच डान्स इस्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी गरज नसती तर कदाचित मी डान्स इस्टिट्यूट उघडले नसते, नृत्याचा कधी व्यवसाय केला नसता.' असं गश्मीर सांगतो. पण गश्मीरची डान्स इस्टिट्यूट अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले. त्यामुळे प्रत्येक  नकारात्मक  गोष्टीतून काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतात असंच गश्मीरच्या बाबतीत घडलं. हेही वाचा - मृण्मयीनं पुन्हा केली गौतमीची चंपी! मोठ्या भावंडांसाठी अभिनेत्रीनं आणलाय मान्सून स्पेशल भन्नाट VIDEO
  गश्मीर सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. तो नेहमीच त्याचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो  शेअर करत असतो. तसेच त्याच्या मुलासोबतचे क्युट व्हिडीओ आणि फोटोदेखील गश्मीर शेअर करत असतो.  गश्मीर हा प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. त्याने 'कॅरी ऑन मराठा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर  देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचं कौतुक झालं. अलीकडेच त्याची सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या