फक्त सपना चौधरी नाही तर बिग बॉसचे हे स्पर्धकही उतरले राजकारणात

फक्त सपनाच नाही तर बिग बॉसमध्ये सहभागी झालेले असे अनेक सदस्य आहेत जे आता राजकारणात सक्रीय होत आहेत.

  • Share this:

बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरीने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. असं म्हटलं जात होतं की, सपना मथुरा येथून हेमा मालिनी यांच्याविरोधात लढणार आहे. मात्र काँग्रेसने महेश पाठक यांना उमेदवार म्हणून मथुरा येथून उभे केले. फक्त सपनाच नाही तर बिग बॉसमध्ये सहभागी झालेले असे अनेक सदस्य आहेत जे आता राजकारणात सक्रीय होत आहेत.

भोजपुरी अभिनेता आणि गायक मनोज तिवारीही २०१० मध्ये बिग बॉसमध्ये आले होते. २००९ मध्ये मनोज यांनी समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला होता. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आज मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार आहेत.

टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिल्पाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. पण तिला सर्वात जास्त प्रसिद्धी भाभीजी घर पर है या मालिकेतून आणि बिग बॉस या शोमधून मिळाली. ती ११ व्या सिझनची विजेती होती.

वादग्रस्त खेळाडू अशी ओळख असलेल्या क्रिकेटर श्रीसंतने बिग बॉस १२ मध्ये सहभाग घेतला होता. याआधी त्याने भाजपकडून निवडणूक लढवली आहे. २०१६ मध्ये त्याने भाजप पक्षात प्रवेश केला. मात्र निवडणूकांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

‘आवाम’ची आवडती अर्शी खाननेही राजकारणात प्रवेश केला आहे. तिनेही काँग्रेस पक्षाचा हात पकडला आहे. अर्शीला मुंबईतील मायनॉरिटी वेल्फेअर कमिटीचं व्हाइस प्रेसिडेंट करण्यात आलं आहे.

भोजपुरी सिनेमांचे सुपरस्टार रवी किशनने २००६ मध्ये बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. रवी किशनने २०१४ मध्ये त्याने काँग्रेसकडून उत्तर प्रदेश येथील जौनपुर येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र यात त्याचा दारुण पराभव झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 06:30 AM IST

ताज्या बातम्या